- सागर निकवाडे
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात (nandurbar lok sabha constituency) भाजपने उमेदवारी नाकारल्यास आपण स्वत: हिमतीने लढणार असल्याची भावना डॉ. समिधा नटावदकर (dr samidha natawadkar) यांनी आज (शुक्रवार) जागतिक महिला दिनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. डॉ. समिधा नटावदकर यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केल्याने भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावीत (mla heena gavit) यांच्या समाेर त्यांनी आव्हान उभे केल्याचे दिसून येते. (Maharashtra News)
आगामी लोकसभेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे जुने कार्यकर्ते सक्रिय होऊ लागले आहेत. नंदूरबार जिल्ह्यात जनसंघाचे आणि आताचे भाजपचे काम तळागाळापर्यंत पोहोचवणारे डाॅ. सुहास नटावदकर यांची कन्या डॉ. समिधा यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी त्या भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करु लागल्या आहेत. साम टीव्हीशी बाेलताना डाॅ. नटावदकर म्हणाल्या ज्यावेळी भाजपाची ताकद नव्हती तेव्हापासून नंदुरबार जिल्ह्यात भाजप वाढवण्याच्या काम नटावदकर परिवारांनी केले. आम्ही भाजपासोबत एकनिष्ठ राहिलाे. लोकसभेची सन 2014 मध्ये आम्हांला पक्षाने डावलण्याची खंत त्यांनी बाेलून दाखवली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
डाॅ. नटावदकर म्हणाल्या आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आणि आजही आहाेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्ष उमेदवारी देईल असा विश्वास आहे. जर पक्षाने यावेळी आमचा विचार केला नाही तरीही आम्ही लोकसभा निवडणूक लढू आणि जिंकू असेही त्यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.