Tarkarli : आधी राेजगार द्या! तारकर्ली समुद्रकिनारा रेड झोन घोषित, सरपंचासह ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदाेलन

बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तारकर्ली समुद्र किनारा रेड झोन असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. पर्यटनावर अवलंबून असलेले व्यवसायिक आणि ग्रामस्थ चिंतेत पडले.
tarkarli sea shore in red zone villagers opposed decision
tarkarli sea shore in red zone villagers opposed decision saam tv

- विनायक वंजारे

Sindhudurg :

जगभरातील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले तारकर्ली समुद्रकिनारा (tarkarli beach) आता रेड झोन होणार आहे. यामुळे तारकर्ली ग्रामस्थ (tarkarli villagers) आक्रमक झाले आहेत. तारकर्ली ग्रामस्थांनी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर एक दिवसीय आंदोलन छेडले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तारकर्ली समुद्र किनारा रेड झोन असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले व्यवसायिक आणि ग्रामस्थ चिंतेत पडले. तारकर्ली समुद्र किनारा रेड झोन होणार असेल तर आपल्यावर उपासमारीची वेळ येणार अशी भावना ग्रामस्थांची झाली आहे. (Maharashtra News)

tarkarli sea shore in red zone villagers opposed decision
महाशिवरात्री 2024 : हर हर महादेव... शंभाे शिव शंकरा घाेषाने दुमदुमली राज्यातील मंदिरे

या निर्णयाच्या विराेधात तारकर्ली ग्रामस्थ एकत्र आले. तारकर्ली ग्रामस्थांनी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन छेडले. यावेळी तारकर्ली सरपंच रुणाली मयेकर यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना आधी ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून द्या नंतर तारकर्ली समुद्र किनारा रेड झोन जाहीर करा अशी मागणी प्रशासनास केली.

Edited By : Siddharth Latkar

tarkarli sea shore in red zone villagers opposed decision
Maharashtra Police Bharti 2024 : पोलिस भरतीत वयोमर्यादा वाढवून द्या : संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com