Surabhi Jayashree Jagdish
लोणावळा आणि खंडाळा ही महाराष्ट्रातील दोन लोकप्रिय थंड हवेची ठिकाणं आहेत. जी विशेषतः पावसाळ्यात त्यांच्या अप्रतिम निसर्ग सौंदर्यासाठी ओळखली जातात.
या काळात इथे अनेक धबधबे प्रवाहित होतात, ज्यामुळे हे दोन्ही परिसर पर्यटकांचे खास आकर्षण बनतात.
हा लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. पावसाळ्यात डॅम ओव्हरफ्लो होतो आणि पायऱ्यांवरून पाणी खाली येते, ज्यामुळे इथे एक नैसर्गिक धबधब्यासारखा अनुभव मिळतो.
हा भारतातील 14व्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा मानला जातो. खंडाळ्यापासून जवळच असलेला हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये खाली कोसळतो आणि पावसाळ्यात त्याचे दृश्य अप्रतिम असतं.
टायगर पॉईंटवरून दिसणाऱ्या दरीच्या विहंगम दृश्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात इथे अनेक छोटे-मोठे धबधबे कोसळताना दिसतात.
खंडाळ्यातील हा प्रसिद्ध पॉईंट त्याच्या विशिष्ट आकारासाठी ओळखला जातो. पावसाळ्यात इथे धुकं आणि ढगांची गर्दी असते, आणि आजूबाजूच्या दऱ्यांमध्ये अनेक छोटे धबधबे वाहताना दिसतात.
वळवण धरणाच्या परिसरात पावसाळ्यात हा धबधबा प्रवाहित होतो. शांतता आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे.