Kedarnath Landslide News In Marathi Saam TV
देश विदेश

Kedarnath Landslide: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये दरड कोसळली; अनेक भाविक दबल्याची भीती

Kedarnath Landslide Marathi News: केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये शुक्रवारी दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत दोन दुकाने जमीनदोस्त झाली असून अनेक भाविक १२ ते १३ भाविक दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Satish Daud

Kedarnath Landslide News: उत्तराखंडमधून एक भयानक घटना समोर आली आहे. केदारनाथमध्ये पुन्हा पावसाने धुमाकूळ घातला असून गौरीकुंडमध्ये गुरूवारी (ता.३ ऑगस्ट) रात्रीच्या दरड कोसळल्याची घटना घडली.

या घटनेत दोन दुकाने जमीनदोस्त झाली असून अनेक भाविक १२ ते १३ भाविक दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्रीच्या सुमारास केदारनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. यावेळी गौरीकुंड परिसरातील दुकानात काही भाविक झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास टेकडीवरून अचानक मातीचा ढिगारा दुकानांवर पडला. या मलब्याखाली दोन दुकाने दबून गेली.

या दुकानात झोपलेले १२ ते १३ भाविक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बेपत्ता नागरिकांमध्ये काही स्थानिक नागरिकांसह नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एनडीआयएफचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्यास सुरूवात झाली आहे.

गौरीकुंड आणि सोनप्रयाग परिसरात गुरुवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे गौरीकुंड परिसरातील मंदाकिनी नदी दुथडीभरुन वाहत आहे. सतत पाऊस कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.

सध्या बचावकार्य बंद असून पाऊस थांबल्यानंतरच बचावकार्य सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बचावपथकाकडून देण्यात आली आहे. गौरीकुंड हा भाग चारधाम यात्रेतील अतिशय महत्त्वाचा टप्पा असून, त्याचं नाव पार्वतीच्या नावावरून ठेवम्यात आलं आहे. केदारनाथ मंदिराच्या मार्गावर जाण्यासाठी गौरीकुंड प्रमुख तळांपैकी एक आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT