Saam TV Breaking News Saam TV Breaking News
देश विदेश

Helicopter Crash : केदारनाथमध्ये पहाटे काळाचा घाला, हेलिकॉप्टर क्रॅश, ७ जणांचा मृत्यू

Kedarnath Helicopter Crash News : केदारनाथजवळ आर्यन कंपनीचं हेलिकॉप्टर कोसळून ७ जणांचा मृत्यू. खराब हवामानामुळे दुर्घटना. सकाळी ५:३०च्या सुमारास गौरीकुंड परिसरात दुर्घटना घडली, तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Kedarnath Aryan aviation helicopter accident latest update : उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पायलटसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान कोसळले. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेची ही घटना सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली. गौरीकुंड परिसरात घास कापणाऱ्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पोलिस, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने दाखल झाली.

खराब हवामान आणि तांत्रिक बिघाड यामुळे वारंवार होणाऱ्या या दुर्घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. दरम्यान, याआधी ८ मे रोजी उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटना घडली होती. त्या अपघातात वैमानिकासह सहा जणांचा मृत्यू झाला होता. यंदाच्या चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटना आणि आणीबाणीच्या लँडिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका हेलिकॉप्टरला रस्त्यावरच क्रॅश लँडिंग करावे लागले होते, तर यात्रेच्या सुरुवातीला झालेल्या एका अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav : गणेशभक्तांवर वेगळंच संकट! ऑर्डर पूर्ण करू शकला नाही, मूर्तिकार अचानक गायब, मूर्तीसाठी धावाधाव

Maharashtra Government: घरबसल्या पूर्ण होतील शासकीय कामे, व्हाट्सअ‍ॅपवर मिळतील कागदपत्रे

Ratnagiri Crime : वडिलांनी घेतलेल्या कर्जातून त्रस्त मुलाने जन्मदात्या आईचा घेतला जीव; रक्ताच्या थारोळ्यात आईला पाहून आत्महत्येचा प्रयत्न

Sambhajinagar: आधी पेट्रोल ओतलं नंतर पेटवून दिलं, माथेफिरूचा पेट्रोल पंपाला आग लावण्याचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बायपास बॉर्डरवरच गेवराई पोलिसांनी रोखलं

SCROLL FOR NEXT