Pahalgam Terror Attack Kashmir Shooting Tourists Saam TV News
देश विदेश

Pahalgam Terror Attack : दहशतवादी हल्ल्यात राष्ट्रवादीचा नेता थोडक्यात बचावला, पहलगामातला थरार सांगितला

Kashmir Pahalgam Terror Attack: धाराशिवमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश बिराजदार काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्ला होण्याआधीच त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली होती.

Namdeo Kumbhar

Kashmir Pahalgam Terror Attack News Update : काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये २८ निष्पाप भारतीयांचा जीव गेला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून अनेकजण जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. हल्ल्यावेळी थोड्याच अंतरावर काहीजण होते, तर काहीजण हल्ला होण्याआधी परिसरातून निघाले होते. नशीब बलवत्तर होतं म्हणून भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेकांचा जीव वाचला. धाराशिवमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. सुरेश बिराजदारही या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. बिराजदार कुटुंबासोबत फिरायला काश्मीर खोऱ्यात गेले होते. हल्ला झाला त्यावेळी ते तीन किमी जवळच होते. हल्ला झाला त्या घाटीतच ते फिरायला जाणार होते, पण त्याआधीच त्यांच्यापर्यंत हल्ल्याची माहिती पोहचली अन् त्यांनी हॉटेलमधून निघणं टाळलं. नशीब बलवत्तर म्हणून बिराजदार यांना हल्ल्याची माहिती मिळाली.

सुरेश बिराजदार हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते कुटुंबासोबत पर्यटनासाठी काश्मीर खोऱ्यात पहलगाम परिसरात फिरायला गेले. ते ज्या ठिकाणी मुक्कामी होते, त्यापासून हाकेच्या अंतरावरच दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. ते म्हणाले की, "आम्ही तिकडे निघालो होतो तोपर्यंत हल्ल्याची माहिती आली. त्यामुळे आम्ही तिकडे जाणं टाळले. घटना घडल्यानंतर अवघ्या काही क्षणात भारतीय सैन्याने या परिसराला वेढा घातला. तात्काळ रूग्णवाहिका परिसरात दाखल झाल्या. त्यामुळे दहशतवाद्यांना तिथून पळ काढावा लागला, अनेकांचा जीव वाचला. भारतीय सैन्याच्या या कार्यतत्परतेचा अभिमान वाटतो."

पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार हे स्वतः उपस्थित होते. जम्मू कश्मीर येथे फॅमिलीसोबत पर्यटनासाठी ते गेले आहेत. हल्ला झाला त्यावेळी ते बेलगाम परिसरात होते, अगदी त्या ठिकाणापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर पहलगाममध्ये हल्ला झाला होता.

बिराजदार यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. दहशतवादाला धर्म नसतो असेही यावेळी त्यांनी सांगितले. या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. बिराजदार यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.बिराजदार यांनी घटनास्थळी घडलेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती दिली.दरम्यान, पहलगाम परिसरात सध्या लष्कराचा कडेकोट बंदोबस्त आहे. जवानांकडून सर्व परिसरात सर्च ऑपरेशन केले जात आहे. दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

SCROLL FOR NEXT