KULGAM TERROR ATTACK: TWO CHHATTISGARH MIGRANT WORKERS KILLED IN KASHMIR, SECURITY FORCES LAUNCH MASSIVE SEARCH OPERATION Saam Tv
देश विदेश

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Kashmir Terror Attack Update News : काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील कीलम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित मजुरांचा मृत्यू. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती समोर.

Alisha Khedekar

  • कुलगाम जिल्ह्यातील कीलम परिसरात दहशतवादी हल्ला

  • छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित मजुरांचा मृत्यू

  • लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती

काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. कुलगाम जिल्ह्यातील कीलम दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडमधील दोन मजुरांचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांनी या मजुरांवर अंधाधुंद गोळीबार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.

काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी कीलम परिसरात दहशतवादी हल्ला झाला. या भीषण हल्ल्यात छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यासारखा हा हल्ला करण्यात आला. मजुरांना त्यांचं नाव विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांनी या मजुरांवर अंधाधुंद गोळीबार केला. गोळीबारात एक मजूर जागीच ठार झाला, तर दुसऱ्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याचाही मृत्यू झाला.

गेल्या दहा दिवसांतील दक्षिण काश्मीरमधील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी २२ जुलै रोजी अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेच्या बंदोबस्तावर तैनात असलेल्या जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका जवानाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. काश्मीरमध्ये स्थलांतरित मजुरांवरील दोन वर्षांतील हा पहिला हल्ला मानला जात आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये बिहारमधील एका मजुराची शोपियां जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती.

दरम्यान काल घडलेल्या या घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पोलिस महासंचालक नलिन प्रभात आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दहशतवाद्यांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्याचे तसेच दोषींना लवकरात लवकर पकडण्याचे निर्देश त्यांनी सुरक्षा दलांना दिले. पीडीपीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरापासून दूर आलेल्या निष्पाप मजुरांना लक्ष्य करणे अत्यंत अमानुष असल्याचे म्हटले. या घटनेमुळे पुन्हा एकदा काश्मीरमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT