देश विदेश

Karni Sena: सपा खासदार रामजी लाल सुमन यांच्या घरावर करणी सेनेचा हल्ला; दगडफेक, वाहनांची तोडफोड

Karni Sena Attacks On MP Ramji Lal Suman House : समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांच्या आग्र्यातील घरावर करणी सेनेने हल्ला केलाय. करणी सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.

Bharat Jadhav

आग्र्यात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षाचे खासदार लाल सुमन यांच्या घरावर हल्ला केलाय. खासदार सुमन यांच्या घरावर दगडफेक केली आणि बॅरिकेड्स तोडले, वाहनांचीही तोडफोड केली. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, यात आंदोलनकर्ते कारच्या काचा फोडताना दिसत आहेत. करणी सेनेच्या लोकांनी घरात ठेवलेल्या खुर्च्याही तोडल्या.

हा राडा झाला तेव्हा पोलीसही घटनास्थळी हजर होते. पोलीस आणि करणी सेनेच्या आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. करणी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत असल्याने पोलिसांना त्यांच्यावर नियंत्रण मिळवता आले नाही. कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने मोठा राडा करत त्यांनी वाहनांची तोडफोड केली.

काय आहे कारण?

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी 21 मार्च रोजी मेवाडचे शासक राणा सांगा यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. रामजी लाल सुमन यांनी राणा सांगाला 'देशद्रोही' म्हटले होते. तेव्हापासून रामजीलाल सुमन यांच्याविरोधात आंदोलने केली जात आहेत. राजस्थानचे उपमुख्यमंत्री दिया कुमारी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह अनेक नेते आणि संघटनांनी रामजी लाल सुमन यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला होता.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्येही करणी सेनेच्या सदस्यांनी सपाच्या राज्य कार्यालयाबाहेर निदर्शने केली होती. यासोबतच खासदार रामजी लाल सुमन यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्या आणि त्यांना जोडे मारणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा करणी सेनेने केली होती.

'बाबर राणा सांगाच्या निमंत्रणावरून भारतात आला होता. हे ऐतिहासिक सत्य आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं खासदार रामजी लाल सुमन यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं होतं.

बाबर भारतीय मुस्लिमांच्या डीएनएमध्ये आहे. भारतातील मुस्लिम मुहम्मद साहिब (प्रेषित मुहम्मद) यांना त्यांची मूर्ती मानतात आणि सुफी परंपरेचे पालन करतात. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नसल्याचं रामजी लाल सुमन म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT