कर्नाटकमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चिघळल्याचे चित्र दिसत आहे.
नाराज मंत्री आणि आमदारांनी दिल्ली गाठल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
डी. के. शिवकुमार यांच्याकडे नेतृत्व गेल्यानंतरही काँग्रेसमधील अंतर्गत वाद
कर्नाटकमधील राजकीय नाटक थांबताना काही दिसत नाहीये. राज्याची सुत्रे डीके शिवकुमार यांच्याकडे आल्यानंतर तेथील राजकीय वादंग थांबेल, अशी आशा होती, परंतु आता पु्न्हा सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. कर्नाटक सरकारमधील नाराज मंत्री आणि आमदारांनी थेट दिल्ली गाठली आहे.
अनेक वर्षांपासून कर्नाटक काँग्रेसमध्ये सिद्धारामैय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून रस्खीखेच सुरू होती. अखेरीस काँग्रेस हायकमांडने या वादात तोडगा काढत शिवकुमार यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व सोपवलं. मात्र त्यानंतरही कर्नाटक काँग्रेसमधील वाद थांबताना दिसत नाहीये.
ज्येष्ठ नेते रामलिंगा रेड्डी यांची नाराजी दूर केल्यानंतर आता शिवकुमार यांच्या सरकारमधील काही मंत्री आणि आमदार नाराज झालेत. खातेवाटपाबाबत नाराज असलेल्या आणि कॅबिनेटमध्ये स्थान मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या काही नेत्यांनी थेट दिल्लीकडे धाव घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकमधील राजकारण पुन्हा एकदा तापलंय.
ज्येष्ठ नेते रामलिंगा रेड्डी यांच्यानंतर आता बेंगळुरू विकास मंत्री कृष्णा बायरे गौडा हे नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे. वजनदार खातं मिळाल्यानंतरही त्यांनी आतापर्यंत औपचारिकपणे आपल्या खात्याचा पदभार स्वीकारलेला नाही. त्यामधून त्यांची नाराजी दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेंगळुरू विकास प्राधिकरण आणि बेंगळुरू मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी यांनाही आपल्या खात्यांतर्गत आणावे यासाठी कृष्णा बायरे गौडा हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींवर दबाब आणत आहेत.
‘बेंगळुरू आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराच्या विकासामध्ये या दोन मोठ्या सरकारी एजन्सीची मुख्य भूमिका आहे. त्यांच्याशिवाय बेंगळुरू विकास विभागाकडे अगदीच मर्यादित अधिकार राहतात. त्यामुळे पुढे काम करणे कठीण होईल.
मलाईदार खाती आणि विभाग मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे बंगळुरूमधील शिवजाइनगर येथील काँग्रेसचे आमदार रिझवान अरषद हेही दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच मंत्रिपद मिळवण्यासाठी रिझवान अरषद हे दिल्लीला गेले आहेत. कॅबिनेटमध्ये रिक्त असलेल्या जागा भरताना किंवा नव्या फेरबदलावेळी आपलं मंत्रिपद निश्चित व्हावं, यासाठी ते हायकमांडकडे लॉबिंग करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.