KARNATAKA POLITICS HEATS UP AS CM SIDDARAMAIAH AND DK SHIVAKUMAR CALLED TO DELHI saam tv
देश विदेश

मंत्रिमंडळात फेरफार की नेतृत्वबदल? मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री दोघांना दिल्लीचा निरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Karnataka Politics: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिल्लीत बोलवलं आहे. मंत्रिमंडळात फेरफार आणि नेतृत्वबदलाच्या चर्चांना जोर चढला आहे.

Bharat Jadhav

  • मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार दिल्लीला रवाना.

  • काँग्रेस हायकमांडसोबत महत्त्वाची बैठक होणार.

  • कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चांना उधाण.

कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत कलह वेळोवेळी चव्हाट्यावर आलाय आता त्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज रात्री ७ वाजता विशेष विमानाने दिल्लीसाठी रवाना होतील. ते उद्या सकाळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतील. इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार देखील दिल्लीला जाणआर असल्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात काही तरी मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. मंगळवारी दिल्लीच्या हायकमांडसोबत होणाऱ्या बैठकीत कर्नाटकबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री- उपमु्ख्यमंत्री सोबत उद्याच बैठक होणार

सूत्रांनुसार, काँग्रेस हायकमांडने कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही दिल्लीत बोलावलंय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. ही बैठक एकत्रितपणे होणार की स्वतंत्रपणे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उद्याच बैठक होणार हे निश्चित आहे.

राज्यसभेच्या जागेसाठी चर्चा होणार

यासह मंगळवारी होणाऱ्या बैठकीत कर्नाटकातून रिक्त होणाऱ्या तीन राज्यसभा जागांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. एका जागेसाठी काँग्रेस अध्यक्षांना आणि दुसऱ्या जागेसाठी लिंगायत उमेदवाराला उमेदवारी देण्याचा पक्ष विचार करत आहे. तिसऱ्या जागेसाठी चर्चा सुरू असून, उपमुख्यमंत्र्यांचे बंधू के. सुरेश यांच्या नावाचाही विचार केला जातोय.

सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, "मला दिल्लीत बोलावण्यात आले आहे. मी उद्या सकाळी ११ वाजता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला भेटणार आहे. वेणुगोपाल यांनी काल रात्री मला फोन करून तारीख आणि वेळ सांगितली आहे. बैठकीचा विषय मला माहीत नाहीये, पण बैठक म्हटलं की, नेहमीच तर्कवितर्क लावले जातात."

दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की,"सुरजेवाला तुम्हाला काय म्हणाले हे मला माहीत नाही. ते मला काहीही म्हणाले नाहीत. मला आमंत्रित केले तर मी जाईन, नाहीतर इथेच राहीन. मुख्यमंत्री बदलाविषयी मला काहीही माहीत नाहीये. मला त्यावर भाष्य करायचे नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT