Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये चाललंय काय? ७० नगरसेवक अचानक संपर्काबाहेर, राज्यातील राजकारणात मोठी खळबळ

MLC Election Congress Corporators Missing : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अनेक नगरसेवक संपर्काबाहेर गेल्यानं काँग्रेसंच टेन्शन वाढलंय.
Congress news
MAHARASHTRA POLITICS: 70 CONGRESS CORPORATORS GO MISSING AHEAD OF MLC ELECTIONSSaam tv
Published On
Summary
  • विधान परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ७० नगरसेवक संपर्काबाहेर.

  • वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग.

  • नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याची चर्चा

राज्यात १७ जागांवरील विधान परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाचा मविआतील काँग्रेसमधील ६० ते ७० नगरसेवक बेपत्ता झाल्याची बातमी समोर येतेय.वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणुकीची पार्श्वभूमीवर मोठी घडामोड होतेय. उमेदवार निश्चित नसतानाही नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे जवळपास ७० नगरसेवक संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय.

काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. परंतु नगरसेवक गायब झाल्याने काँग्रेस नेत्यांची चिंता वाढली आहे. पक्षांतर्गत अस्वस्थता समोर आली आहे. विधान परिषदेची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधीच्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, नगरसेवक मतदान करतील, त्यामुळे प्रत्येक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्याला महत्त्व आले आहे. अशातच भाजपने मोठी खेळी खेळली आहे.

Congress news
Congress: पोटनिवडणुकीआधीच महाराष्ट्राचं राजकारण ढवळणार; काँग्रेसमध्ये होणार मोठा उलटफेर, बड्या नेत्यानं सांगितला प्लान

दरम्यान नगरसेवक गायब झाल्यानं विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडे बाजार होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. एका मतासाठी १० लाखांपर्यंत व्यवहार झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. नगरसेवकांना आगाऊ रक्कम दिल्याचा दावा करण्यात येत आहे.

Congress news
Congress MP: राजीनामा देण्याच्या २४ तासाच्या आत काँग्रेस खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश; राज्यातील राजकारणात खळबळ

काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत, राजकीय चर्चांना उधाण

काँग्रेसच्या मोठ्या गट अचानक संपर्काबाहेर गेल्यानं भाजप नेते नगरसेवकांना बाहेर हलवत असल्याची चर्चा, काँग्रेसमधील गटबाजीचाही संशय व्यक्त केला जातोय. शिवानी वडेट्टीवार यांच्या संभाव्य उमेदवारीनंतर काँग्रेसमध्ये नाराजी आली आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आली आहे. गायब झालेल्यांमध्ये चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, सावलीतील नगरसेवकांचा समावेश आहे. वडेट्टीवार याचे राजकीय वर्चस्व असलेल्या भागातील नगरसेवक संपर्काबाहेर गेल्यानं हा विजय वडेवट्टीवार यांच्यासाठी मोठा धक्का मानलो जातोय.

काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले याचा विचार पक्षाच्या नेत्यांनी करावा - बावनकुळे

एकीकडे भाजपवर घोडेबाजाराचा आरोप होत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. भाजप-महायुती सर्व 17 जागा जिंकणार,नागपूरात सर्वच पक्षांना आवाहन केलं आहे की 800 पैकी 600 मतं भाजप महायुतीकडे आहे,त्यामुळे एक साईड निवडणूक आहे,संख्याबळावर या निवडणूक होत असतात,पण संख्याबळ नसेल तर निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात असं माझं मत आहे,मी सर्वांशी बोलणार आहे,हर्षवर्धन सपकाळ,शरद पवार,उद्धव ठाकरे यांना विनंती करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com