karnataka, orange alert, kodagu, schools, college, anganwadi , holiday saam tv news
देश विदेश

Rain : पावसाचा जाेर वाढला; अंगणवाडीसह शाळा, महाविद्यालयांनी सुटी जाहीर

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जाेर वाढला आहे.

साम न्यूज नेटवर्क

कर्नाटक : महाराष्ट्र (maharashtra) प्रमाणेच कर्नाटक (karnatak) राज्यात देखील विविध जिल्ह्यांना पावसाचा (rain) माेठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटक राज्यातील मडिकेरीजवळ भूस्खलन होऊन गेल्या 24 तासांत 128 विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने कोडागूमध्ये (Kodagu) ऑरेंज अलर्ट (Orange Alert In Kodagu) घोषित केला आहे. (Rain Latest Marathi News)

कर्नाटकात मान्सून सक्रिय झाल्यानंतर 27 जूनपासून पाच ठिकाणी दरडी कोसळल्या. मडिकेरी तालुक्यातील तलथमाने येथे सोमवारी माेठ्या प्रमाणात दरड काेसळल्याने कोडागुच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनेची दखल घेत या भागात मदत कार्य सुरु केले.

गेल्या वर्षी कोडगूमध्ये (चार जूलैस) 0.59 मिली मीटर पावसाची नोंद झाली. यंदा (चार जूलैस) 48 मिली मीटर पावसाची नोंद झाली. गेले दाेन दिवस पडत असलेल्या पावसामुळे आणि हवामान खात्याने जिल्हा ऑरेंज अलर्टमध्ये असल्याचे जाहीर केल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून कोडगू जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT