Karnataka CM Post Announcement, Siddaramaiah Vs DK Shivakumar SAAM TV
देश विदेश

Siddaramaiah Vs DK Shivakumar : सिद्धरामय्या की शिवकुमार, कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? ३ शक्यता आल्या समोर

Karnataka CM Post Announcement : कर्नाटकात काँग्रेसचं बहुमत सिद्ध झालं असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याचं उत्तर विधानसभा निवडणूक निकालाच्या तीन दिवसांनंतरही मिळू शकलेले नाही.

Nandkumar Joshi

Karnataka CM Post Announcement, Siddaramaiah Vs DK Shivakumar : कर्नाटकात काँग्रेसचं बहुमत सिद्ध झालं असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याचं उत्तर विधानसभा निवडणूक निकालाच्या तीन दिवसांनंतरही मिळू शकलेले नाही.

काँग्रेस विजयी झाला असला तरी, मुख्यमंत्रिपदाचा पेच दोन बड्या नेत्यांच्या दावेदारीनं वाढला आहे. एकीकडे ७७ वर्षीय सिद्धरामय्या आणि दुसरीकडे ६१ वर्षीय डीके शिवकुमार यांचीही दावेदारी आहे. मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटत नसला तरी, आता सत्तावाटपाचे तीन फॉर्म्युले समोर आले आहेत. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब हायकमांडच करतील यात दुमत नाही. (Latest Marathi News)

२ वर्षे सिद्धरामय्या, ३ वर्षे शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद

एका हिंदी वृत्तसंकेतस्थळानं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांनी एका शक्यतेची सूचना दिली आहे. सुरुवातीची २ वर्षे स्वतः सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपद मिळावं, तर नंतरची ३ वर्षे डी के शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिलं जावं, असे त्यांचे म्हणणे आहे.

सिद्धरामय्या म्हणाले की, किमान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पहिल्या टप्प्यात सरकारचा गाडा हाकण्याची इच्छा आहे. तर शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांचा हा फॉर्म्युला राजस्थान आणि छत्तीसगडचा हवाला देतानाच फेटाळला आहे.

एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री करावेत

कर्नाटकमधील मुख्यमंत्रिपदाचा पेच सोडवण्यासाठी आणखी एक फॉर्म्युला समोर आला आहे. एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री करावेत. एका कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री करावे. तर तीन नेत्यांना उपमुख्यमंत्री करावे. हे तिन्ही नेते वेगवेगळ्या समाजाचे असावेत.

लिंगायत समाजाकडून एम बी पाटील यांना उपमुख्यमंत्री करावे. तर २१ टक्के लोकसंख्येच्या एससी/एसटी समाजातून जी परमेश्वर आणि ७ वेळा खासदार राहिलेले केएच मुनियप्पा यांनाही उपमुख्यमंत्री करावे, असा फॉर्म्युला आहे.

मुनियप्पा हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उतरले होते. या फॉर्म्युलातून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी अटकळ बांधली जाते.

सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करावे, तर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करावे

कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्रिपदाबाबत दोन शक्यता समोर आल्या होत्या. तर तिसरा फॉर्म्युलाही सांगण्यात आला आहे. हायकमांडच्या शब्दामुळे शिवकुमार हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार होऊ शकतात. तर त्याच्यासोबत त्यांच्याकडे महत्वाची खाती दिली जावीत, असा एक मतप्रवाह आहे. तर दुसरीकडे डी के शिवकुमार यांच्याकडे दोन-अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जावी, असा दुसरा मतप्रवाह आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT