Lok Sabha Election 2024: कर्नाटक निवडणुकीनंतर वारे फिरले! काँग्रेसला लोकसभेच्या 200 जागांवर पाठिंबा देण्यास ममता बॅनर्जी तयार

कर्नाटक निवडणुकीनंतर वारे फिरले! काँग्रेसला लोकसभेच्या 200 जागांवर पाठिंबा देण्यास ममता बॅनर्जी तयार
Mamata Banerjee On Lok Sabha 2024
Mamata Banerjee On Lok Sabha 2024Saam tv

Mamata Banerjee On Lok Sabha 2024 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेच्या या विजयची दाखल आता राष्ट्रीय पातळीवरही घेतली जात आहे. यातच आता पश्चिम बांगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याबाबत वक्तव्य केलं आहे.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या आहेत की, ज्या राज्यांमध्ये त्यांची परिस्थिती बळकट आहे, तेथे टीएमसी (TMC) काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र बंगालसारख्या राज्यात काँग्रेसला टीएमसीला मदत करावी लागेल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

Mamata Banerjee On Lok Sabha 2024
Hizb-ut-Tahrir News : हिज्ब-उत-तहरिरचा भांडाफोड! आधी स्वतःचा धर्म सोडला, नंतर 3 हिंदू तरुणींनाही धर्मांतर करण्यास भाग पाडलं

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरू व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत. बांगलामध्ये पत्रकार परिषेदेला संबोधित करताना ते म्हणाले आहेत की, ''मी जादूगार नाही, ज्योतिषीही नाही. भविष्यात काय होईल हे मी सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते, जिथे प्रादेशिक पक्ष बळकट आहेत, तिथे भाजप लढू शकत नाही. कर्नाटकच्या जनतेने केलेलं मतदान हे भाजप सरकारच्या विरोधातला जनादेश आहे.'' (Latest Marathi News)

ते पुढे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. लोकशाही बुलडोझरने चिरडली जात आहे. पैलवानांचेही ऐकले जात नाही. त्यामुळे या परिस्थितीत सर्वानी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.

Mamata Banerjee On Lok Sabha 2024
Viral News: दोन सख्ख्या बहिणींनी एकाच मुलाशी केलं लग्न, कारण जाणून व्हाल भावुक

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ज्या जागांवर काँग्रेस पक्ष मजबूत आहे, त्या जागांवर ते भाजपशी लढू शकतात. त्या म्हणाले, ''सशक्त पक्षाला प्राधान्य द्यायला हवे आणि जिथे काँग्रेस पक्ष मजबूत असेल तिथे त्यांना लढू द्या, आमचा पाठिंबा असेल. मात्र त्यासाठी काँग्रेसला इतर पक्षांनाही साथ द्यावी लागणार आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com