Karnataka Election 2023 Schedule: भारतीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकची निवडणूक एका टप्प्यात होणार असून 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. येत्या 24 मे रोजी कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यापूर्वी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
- 80 वर्षांहून अधिक वयाचे लोक घरातून मतदान करू शकतील.
- कर्नाटकात 9.17 लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली.
- 1 एप्रिल रोजी ज्यांचं वय 18 असेल ते तरुण-तरुणी देखील मतदान करू शकतील.
- नवीन मतदारांना जोडण्यावर भर देण्यात येत आहे.
- 24 मे पूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.
- कर्नाटकमध्ये एकूण 5.22 कोटी मतदार आहेत.
- निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
- मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आभियान चालवले जाईल.
- 240 मॉडल मतदान केंद्र बनवले जाईल.
विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक
कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 224 जागांवर निवडणूक होणार आहे. 224 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे 69 आमदार आहेत. दरम्यान 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 80 जागा जिंकल्या, तर जेडीएसने 32 जागा जिंकल्या आणि भाजपला 117 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय 6 इतर आमदार निवडून आले होते. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळू शकले नाही.
कर्नाटकात 2018 पासून तीन मुख्यमंत्री
2018 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. परंतु बीएस येडियुरप्पा यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र ते बहुमत सिद्ध करू न शकल्याने एका दिवसानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने मिळून सरकार स्थापन केले आणि जेडीएस नेते कुमारस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा आली.
काँग्रेसचे सरकारही 14 महिन्यात पडले
काँग्रेस आणि जेडीएसचे युतीचे सरकार सुमारे 14 महिन्यांनंतर पडले आणि त्यानंतर बीएस येडियुरप्पा यांनी बंडखोर काँग्रेस आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र नंतर भाजपने राज्याचे मुख्यमंत्री बदलले आणि बसवराज बोम्मई राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.
काँग्रेसने जाहीर केली 124 उमेदवारांची नावे
निवडणूक आयोग आज कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. 224 विधानसभा जागांसह कर्नाटकात काँग्रेसने यापूर्वीच 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. लवकरच उर्वरित उमेदवारांचीही नावे जाहीर केली जातील असे डीके शिवकुमार यांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.