Karnataka Elections: कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. आज 11 वाजता निवडणूक आयोग यासंदर्भात घोषणा करणार आहेत. या तारखा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस नेत्याच्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार (D K Shivkumar) रोड शो करताना दिसत आहे.
या रोड शो दरम्यान शिवकुमार लोकांवर नोटा उडवताना दिसत आहेत. मंड्या जिल्ह्यातील बेनिवहल्ली येथे रोड शो करत असतानाचा डीके शिवकुमार यांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निवडणुकीच्या काळात वादाचा विषय
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने श्रीरंगणपट्टणमध्ये 'प्रजा ध्वनी यात्रा' आयोजित केली होती. या भेटीदरम्यान डीके शिवकुमार काही लोकांवर नोटा फेकताना दिसले. त्याच्या शेजारी ढोल-ताशे वाजवणाऱ्या कलाकारांना तो बक्षीस म्हणून पैसे देत होते, असे बोलले जात आहे. मात्र निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे पैसे फेकणे हा वादाचा विषय बनला आहे.
भाजपने उपस्थित केला प्रश्न
कर्नाटक भाजपने हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की 'ते म्हणतात की त्यांच्या चार पिढ्या काँग्रेसमध्ये राहिल्या आहेत. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला वास्तव समजेल'. दरम्यान या व्हिडिओबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
काँग्रेसने जाहीर केली 124 उमेदवारांची नावे
निवडणूक आयोग आज कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. 224 विधानसभा जागांसह कर्नाटकात काँग्रेसने यापूर्वीच 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. लवकरच उर्वरित उमेदवारांचीही नावे जाहीर केली जातील असे डीके शिवकुमार यांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.