Vastu rules for gas cylinder: वास्तू शास्त्रानुसार घरात एलपीजी सिलेंडर कोणत्या दिशेला ठेवावा?

Surabhi Jayashree Jagdish

एलपीजी सिलेंडर

भारतामध्ये एलपीजी सिलेंडरबाबत अनेक ठिकाणी चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. यामुळे लोकांमध्ये थोडी भीतीही दिसून येतेय. घरगुती वापरासाठी एलपीजी सिलेंडर अत्यंत महत्त्वाचा असल्याने ही चिंता वाढली आहे.

देशात कोट्यवधी एलपीजी ग्राहक

आकडेवारीनुसार, भारतात ३२.९ कोटींहून अधिक एक्टिव्ह घरगुती एलपीजी ग्राहक आहेत. यावरून एलपीजीचा वापर किती मोठ्या प्रमाणात होतो हे स्पष्ट होतं. बहुतेक प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर वापरला जातो.

प्रत्येक घरात गॅस सिलेंडरचा वापर

आजच्या काळात जवळपास प्रत्येक कुटुंबाच्या स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर असतो. स्वयंपाकासाठी तो सर्वात सोयीस्कर आणि सामान्य पर्याय बनला आहे.

योग्य दिशा

तरीही आजही अनेक लोकांना गॅस सिलेंडर कोणत्या दिशेला ठेवावा हे माहीत नसते. वास्तुशास्त्रानुसार याबाबत काही ठराविक नियम सांगितले गेले आहेत. हे नियम पाळल्यास घरात सकारात्मक वातावरण राहतं असं मानलं जातं.

दक्षिण-पूर्व दिशा सर्वात योग्य

वास्तुशास्त्रानुसार गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी दक्षिण-पूर्व दिशा योग्य मानली जाते. या दिशेला ‘अग्नि कोन’ असंही म्हटलं जातं. स्वयंपाकाशी संबंधित वस्तू या दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं.

पूर्व दिशा

जर दक्षिण-पूर्व दिशेला सिलेंडर ठेवणे शक्य नसेल तर तो पूर्व दिशेला ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार ही दिशाही योग्य मानली जाते. मात्र काही दिशा टाळणं आवश्यक असल्याचं सांगितलं जातं.

कोणती दिशा टाळावी

वास्तुशास्त्रानुसार गॅस सिलेंडर उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नये. या दिशांना सिलेंडर ठेवल्यास घरात कलह किंवा अपघात होण्याची शक्यता वाढते असं मानलं जातं. तसंच यामुळे आर्थिक अडचणीही निर्माण होऊ शकतात.

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

raigad fort history
येथे क्लिक करा