Prajwal Revanna Saam Tv
देश विदेश

Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; परराष्ट्र मंत्रालय मोठ्या कारवाईच्या तयारीत

Prajwal Revanna Latest News : खासदार प्रज्वल्ल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालय मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : कर्नाटकातील जनता दलाचे खासदार प्रज्वल्ल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालय मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. कर्नाटक सरकारने रेवण्णा यांचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालय लवकरच यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून खासदार रेवण्णा यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. सिद्धारमैया यांनी पत्रात म्हटलं की, 'रेवण्णा यांच्यावर आरोप सिद्ध होण्याच्या आधी त्यांनी देश सोडला. त्यांनी डिप्लोमेटिक पासपोर्टचा वापर केला. रेवण्णा यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप आहे. रेवण्णा यांचे कथित महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणात कर्नाटक सरकारने चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे.

खासदार रेवण्णा यांच्या विरोधात लुक आऊट सर्कुलर आणि ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालय रेवण्णा यांचा डिप्लोमेटिक पासपोर्ट रद्द करण्याची विचारात असल्याची माहिती मिळत आहे.

मंत्रालयाकडून मिळाली नव्हती मंजुरी

रेवण्णा यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीशिवाय डिप्लोमॅटिक पासपोर्टवर प्रवास केला. नियमानुसार, खासगी प्रवासासाठी डिप्लोमॅटिक पासपोर्टचा वापर करता येत नाही. तसेच डिप्लोमॅटिक पासपोर्टचा वापर करून प्रवास करण्याआधी मंत्रालयाची परवानगी असणे गरजेचे असते. मात्र, रेवण्णा यांना देशाबाहेर जाण्यासाठी मंत्रालयाकडून माहिती मिळाली नव्हती, अशी माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: राम मंदिरातून दररोज ६ ते ८ लाखांची चोरी; पैसा नेमका कुठे जात होता?

Low Heart Rate: लो हार्ट रेटमुळे ब्लड प्रेशरही कमी होऊ शकतो का? ही लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Face Care: चाळीशीतही २० वर्षांच्या मुलीसारखा गुलाबी ग्लो पाहिजे? मग फेसवॉश नव्हे, वापरा 'ही' घरगुती सामग्री

काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT