Karnataka Chitradurga sleeper bus container accident : कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये पहाटे कंटेनर अन् बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १७ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. तर २२ जण जखमी झाले आहेत. खासगी स्लीपर बस बेंगळुरूहून गोकर्णाकडे जात होती. पहाटेच्या वेळ होती, त्यामुळे प्रवाशी गाढ झोपेत होते. त्याचवेळी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर हिरियुर तालुक्यातील गोरलाथू क्रॉस येथे कंटेनर अन् बसची जोरात धडक झाली. या अपघातानंतर खासगी स्लीपर बसमध्ये भीषण आग लागली अन् १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात २२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
हिरियुर तालुक्यातील गोरलाथू क्रॉस येथे पहाटे अपघातानंतर खासगी बसने पेट घेतला. पहाटेची वेळ असल्याने अनेकजण गाढ झोपेतच होते. एका क्षणात बसमध्ये सगळीकडे आग पसरली. आरडाओरड आणि किंचाळ्याने परिसर हादरला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अन् अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळावर पोहचल्या. तात्काळ बचावकार्य सुरू झाले. २२ जणांना वाचवण्यात यश आले. ते सर्वजण जखमी आहेत, त्यांच्यावर हिरियुर आणि चित्रदुर्गातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात नेमका झाला कसा ?
खासगी बस बंगळुरूहून गोकर्णाला निघाली होती. त्याचवेळी एक कंटेनर बंगळुरूकडे निघाला होता. हिरियुर येथे कंटेनर चालकाचा ताबा सुटला अन् डिव्हायडर तोडून विरूद्ध दिशेला खासगी बसला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की बसचा चक्काचूर झाला अन् आग लागली. खासगी स्लीपर बसमध्ये आगीचा तांडव उडाला. कंटेनर खासगी बसच्या मधोमध जोरात धडकल्याने कोचला आग लागली, त्यात अनेकजण अडकले. १७ जणांचा होरपळून जिवंत मृत्यू झाला.
मृताचा आकडा वाढण्याची भीती -
हा अपघात इतका भयानक होता की बसचा जळून कोळसा झाला. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जखमींची प्रकृती पाहता मृतांची संख्या वाढू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. पोलिसांकडून या अपघाताची नोंद करण्यात आली. अपघातावेळी जीव वाचणाऱ्या अनेकजण गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या कंटेनर चालकाची चूक असल्याचे दिसतेय.हिरीयुर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.