Karnataka Bengaluru accident news 
देश विदेश

Accident : हायवेवर मृत्यूचं तांडव! ३ वाहनांचा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, चालक अन् ६ बारावीच्या मुलांचा मृत्यू

Karnataka Bengaluru accident news : बंगळुरूच्या होस्कोट परिसरात झालेल्या भीषण तिहेरी अपघातात बारावीच्या सहा विद्यार्थ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला असून पोलिस तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Bengaluru Accident Death Toll Update News : कार, बाईक अन् कॅन्टरच्या भयानक तिहेरी अपघातामुळे रस्त्यावर मृत्यूचं तांडव झाले. या भीषण अपघातात बारावीच्या ६ सहा मुलांसह ७ जणांचा जागीच मृत्यू झालाय. बंगळुरूमधील होसकोटेमध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. होस्कोट-दबासपेटे राष्ट्रीय महामार्गावर एम सत्यवारा गावाजवळ शुक्रवारी हा भयंकर अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने पाठीमागून दुचाकीला जोरात धडकली. अनियंत्रित झालेली कार कॅन्टरला जोरात धडकली. या तिहेरी अपघातात दुचाकी चालकासह ६ बारावीच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीत शिकणारे ६ विद्यार्थी कारने लाँग ड्राईव्हसाठी रात्री घराबाहेर पडले होते. अभ्यासाच्या तणावातून बाहेर निघण्यासाठी सर्वजण फिरायला बाहेर पडले होते. पण होस्कोट राष्ट्रीय महामार्गावर एम सत्यवारा गावाजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले अन् कारने मागून दुचाकीला जोरात धडक दिली. कारचा वेग जास्त असल्याने ती कॅन्टरलाही जाऊन धडकली. या भीषण अपघातात बारावीच्या सहा मुलांचा आणि दुचाकी चालक गगन याचा मृत्यू झाला. अश्विन नायर,अरहान शरीफ, अयान अली, भरत, एथन जॉर्ज आणि फरहान यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

महामार्गावर झालेला हा अपघात इतका भयंकर होता की कारमधील सर्व एअरबॅग अघडल्या गेल्या. पण अतिवेग असल्याने कारमधील मुलांचा जीव वाचू शकला नाही. कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर डिव्हाडर ओलांडून समोरून येणाऱ्या कॅन्टरला धडक दिली. या अपघातात काम आटोपून घरी जात असलेल्या दुचाकीचालक गगन याचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, होस्कोट-दबासपेटे राष्ट्रीय महामार्गावरील एम सत्यावरा गावाजवळ हा भयंकर तिहेरी अपघात झाला. होस्कोटहून देवनहल्लीकडे जाणारी XUV 700 कार (KA 03 NW 0138) आधी समोरील चुचाकीला जोरात धडकली. नंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कॅन्टर वाहनाला धडक दिली. या अपघातात आणखी एक कारही धडकली. त्यामुळे दोन्ही कार, एक कॅन्टर आणि एक दुचाकी यांच्यात मोठी टक्कर झाली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ६ बारावीचे मुले असल्याचे समोर आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT