KOPPAL TRUCK ACCIDENT: 6 DEVOTEES KILLED IN TRAGIC KARNATAKA ROAD CRASH Saam Tv
देश विदेश

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! १९ भाविकांना घेऊन जाणारा ट्रक उलटला, 6 जणांचा जागीच मृत्यू

Karnataka Truck Accident news : कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात देवीदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत.

Alisha Khedekar

  • कोप्पलमध्ये भाविकांच्या ट्रकचा भीषण अपघात

  • सहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी

  • भरधाव ट्रकच्या धडकेमुळे दुर्घटना

  • चालकाला अटक, पोलिसांचा तपास सुरू

कर्नाटकातून मोठी बातमी समोर आली आहे. कोप्पल जिल्ह्यात देवीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भाविकांच्या ट्रकला मागून भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघाताप्रकरणी भरधाव वेगात वाहन चालवणाऱ्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुडलिगी परिसरातील गावांमधील सुमारे १९ भाविक हुलिगेम्मा देवी मंदिर येथे दर्शनासाठी ट्रकने जात होते. शुक्रवारी सकाळी होसपेट–मुनिराबाद सीमेवरील राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या ट्रकला मागून दुसऱ्या एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये सर्वजण स्थानिक गावांतील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली होती. अनेक कुटुंबांवर या अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, बल्लारी रेंजचे आयजीपी डॉ. पी. एस. हर्षा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ट्रक चालकाला तात्काळ अटक करण्यात आली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाईल. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा वेग जास्त असल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Jayanti: ज्येष्ठ अमावस्या आणि शनिवारचा महासंयोग, या चुका टाळा नाहीतर शनिदेव होऊ शकतात नाराज

Maharashtra News Live Update: शरद पवार बारामती दौऱ्यावर, पिकांची केली पाहणी

PM Kisan Yojana: पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार? पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Famous Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; परिवाराने लपवली निधनाची बातमी

Shani Sadesati Upay: शनिजयंतीला करा 'हे' ५ उपाय, साडेसातीपासून होईल कायमची सुटका

SCROLL FOR NEXT