Karnataka Accident Saam Tv
देश विदेश

Karnataka Accident: फळं- भाज्या घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला, १० जणांचा जागीच मृत्यू; पाहा अपघाताचा थरारक VIDEO

Karnataka Truck Accident: कर्नाटकमध्ये ट्रक ५० फूट खोल दरीमध्ये कोसळला. फळं आणि भाज्या घेऊन जाणाऱ्या या ट्रकच्या अपघातामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले आहेत.

Priya More

कर्नाटकमध्ये बुधवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. फळं आणि भाज्या घेऊन जाणारा ट्रक दरीमध्ये कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यालापुरा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या महामार्गावर गुलापुरा येथे भाजीपाला आणि फळं घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. ट्रकचे नियंत्रण सुटले आणि ट्रक ट्रिपरवर आदळला त्यानंतर ५० मीटर दरीत कोसळला. या अपघातामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये ट्रकमधून प्रवास करणाऱ्या १० जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.

ट्रकमधून भाजीपाला आणि फळं विक्रीसाठी घेऊण जाणारे व्यापारी प्रवास करत होते. अपघातामध्ये १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व फळ विक्रेते सावनूर येथून फळे विकण्यासाठी यलापुराच्या दिशेने जात होते. हे सर्वजण सावनूर-हुबळी रस्त्यावरून जात असताना जंगल परिसरात हा अपघात झाला.

पोलिसांनी पुढे सांगितले की, 'पहाटे चारच्या सुमारास ट्रक चालक दुसऱ्या वाहनाला रस्ता देण्याचा प्रयत्न करत असताना डावीकडे गेला आणि सुमारे 50 मीटर खोल दरीत पडला. या महामार्गावर रस्त्यावर सुरक्षा भिंत नाही. अपघाताणध्ये जखमी झालेल्यांना हुबळी येथील KIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी यल्लापूरा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व व्यापारी हावेरी जिल्ह्यातील सावनुरू शहरातील रहिवासी होते. फैयाज इमाम साब जमखंडी (४५ वर्षे), वसीम विरुल्ला मुदगेरी (३५ वर्षे), एजाज मुस्तका मुल्ला (२० वर्षे), सादिक भाषा फराश (३० वर्षे), गुलाम हुसेन जावली (४० वर्षे), इम्तियाज मामजफर मुलाकेरी (३६ वर्षे), अल्पाज जाफर मंदाक्की (२५ वर्षे)), जिलानी अब्दुल जाखती (२५ वर्षे) आणि अस्लम बाबुली बेनी (२४ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. हुबळी येथील रुग्णालयात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : तरुणींच्या नृत्यात रंगला माहोल, पण अचानक स्टेज कोसळला अन्....; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Chintamani Aagman 2025 : भक्तांची चिंता दूर करणाऱ्या चिंतामणीचा फर्स्ट लूक; पाहा फोटो

Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

SCROLL FOR NEXT