Kala Chashma Song Viral Video Saam TV
देश विदेश

Dance Video : 'काला चश्मा' गाण्यावर थिरकल्या विदेशी तरुणी; पाहा जबरदस्त VIDEO

या व्हिडीओला जवळपास 5 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले

साम टिव्ही ब्युरो

Kala Chashma Songs Girls Dance Viral Video : अभिनेत्री कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा 'बार बार देखो' हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'काला चश्मा' हे गाणं सुपरहिट झालं. या गाण्याने लहान मुलांपासून थोरमोठ्यांना वेड लावलंय. गाणं जुनं झालं असलं तरी, त्याची क्रेज मात्र अजूनही कायम आहे. तरुणी आणि महिलाही या गाण्यावर थिरकत असतात. सोशल मीडियावर (Social Media) काला चश्मा गाण्यावरील अनेक व्हिडीओ आहेत. या गाण्यावरचा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट डान्स व्हायरल झाला आहे. (Girls Dance Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत काही तरुणी व्हॉलीबॉल खेळत आहे. त्याचवेळी त्यांनी काला चश्मा या गाण्यावरही जबरदस्त डान्सही केलाय. हा व्हिडीओ इनडोअर व्हॉलीबॉल कोर्टमध्ये शूट करण्यात आलाय. तरुणींचा एका गृपने या गाण्यावर चांगलाच ठेका धरला. या व्हिडीओमधल्या (Viral Video) तरुणींच्या डान्स स्टेप्स पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ wholesomememeworld नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आल आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना इतका आवडला आहे की, आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास 5 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक लोकांनी कमेंटमध्ये फायर इमोजीसह आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘काला चष्मा’ हे गाणे अमर अर्शी, बादशाह आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे. मूळ हे गाणं प्रेम हरदीप आणि काम ढिल्लन यांनी संगीतबद्ध केले होते. हे गाणे परदेशातही डान्सची आवड असलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय झालं आहे. भारतात सुद्धा या गाण्यावर थिरकतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT