Jodhpur Cylinder Blast
Jodhpur Cylinder Blast Saam Tv
देश विदेश

Jodhpur Cylinder Blast : भीषण! लग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट; एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Shivani Tichkule

Jodhpur Cylinder Blast News : राजस्थानमधून (Rajasthan) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जोधपूरमध्ये एका लग्न समारंभात एकापाठोपाठ एक 5 सिलिंडर स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात आतापर्यंत 60 जण जखमी झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जोधपूर रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

ही घटना शेरगडजवळील भुंगरा गावात गुरुवारी (8 डिसेंबर) दुपारी 3.15 वाजता घडलीआहे. लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने लग्नसमारंभात गोंधळ उडाला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभात स्वयंपाक करण्यासाठी 20 गॅस सिलिंडर मागवण्यात आले होते. यापैकी एकाला आग लागली, त्यानंतर एकापाठोपाठ एक 5 सिलिंडरचा स्फोट झाला. जोधपूरमधील भूंगरा गावात ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता रुग्णालयात पोहोचले. एसएन मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. दिलीप कछावा यांनी सांगितले की, ६० जण जखमी झाले असून त्यापैकी ५१ जणांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात आठ जण गंभीररित्या जळाले होते. सर्व लोकांना वेगवेगळ्या ४८ वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून एक बालक सध्या आयसीयूमध्ये आहे. तर पाच आणि सात वर्षांच्या दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT