Madhya Pradesh : ४०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला; ६० तास चिमुकला अडकूनच, स्पॉटवर सध्या काय घडतंय?

तब्बल ६० तास उलटून गेले, तरी या चिमुकल्याला अजूनही बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आलेलं नाही.
Madhya Pradesh News
Madhya Pradesh NewsANI
Published On

मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मंगळवारी (६डिसेंबर) एक दुर्देवी घटना घडली. मांडवी गावात ८ वर्षीय चिमुकला खेळता-खेळता ४०० फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये पडला. या घटनेला तब्बल ६० तास उलटून गेले, तरी या चिमुकल्याला अजूनही बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आलेलं नाही. चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून बचावकार्य करण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Madhya Pradesh News
Nashik Crime : बाप बनला हैवान! पोटच्या मुलीवर केले अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना

तन्मय साहू असं या चिमुकल्याचे नाव असून सुनील साहू असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. तन्मयला वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एचडीआरएफ, जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, तहसीलदार त्याचबरोबर पोलीस अधिकारी कर्मचारी आणि सर्व ग्रामपंचायत पातळीवरचे ग्रामस्थ उपस्थित आहेत.

सहा पोकलँड मशीनच्या साहाय्याने सध्या घटनास्थळी (Madhya Pradesh) खोदकाम सुरू असल्याची माहिती मिळते आहे. सध्या या बालकाची प्रकृती चांगली असून या बालकाला सुखरूप काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मध्य प्रदेश सरकारचे सुरू आहेत. तन्मयला बाहेर काढण्यासाठी बोअरवेलच्या बाजूने समांतर ४४ फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. ८ फूट रुंदीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

Madhya Pradesh News
Mumbai Crime : पतीने सर्च केलं मसाज सेवा; पहिलाच दिसला पत्नीचा फोटो, त्यानंतर जे घडलं ते कल्पनेच्या पलीकडे!

दगडामुळे बोगदा बनवण्यात अडचण येत आहे. बचावकार्य पूर्ण होण्यासाठी ४ तासांपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. जोपर्यंत हा चिमुकला सुखरूप बाहेर काढला जाणार नाही तोपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. ज्या लोकांकडे अशा प्रकारचे खुले बोअर असतील त्यांनी ते बुजवावे असे आव्हान देखील मध्य प्रदेश सरकारने केले आहे.

काय घडलं होतं?

बैतूर जिल्ह्यातील मांडवी गावात मंगळवारी (६डिसेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, तन्मय मैदानात खेळत होता. याच दरम्यान त्याने बोअरवेलमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला असता तोल गेल्याने तो त्यात पडला. मूल न दिसल्याने सर्वजण बोअरवेलच्या दिशेने धावले. बोअरवेलच्या आतून मुलाचा आवाज आला. यावर कुटुंबीयांनी तत्काळ बैतूल व आठनेर पोलिसांना माहिती दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com