High Court on Government Job
High Court on Government Job  saam tv
देश विदेश

Government Job : कुटुंबाची जबाबदारी टाळली तर सरकारी नोकरी जाणार, अनुकंपा नियुक्त्यांवर HC कठोर

Nandkumar Joshi

Government Job High Court Statement : अनुकंपा तत्वावर नोकरी मिळालेल्यांसाठी इशारा आहे. बेजबाबदारपणामुळं तुम्ही नोकरी गमावू शकता. अलाहाबाद कोर्टानं एका प्रकरणावर सुनावणी करताना याबाबत निकाल दिला आहे. हायकोर्टात रेल्वेमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवणाऱ्या व्यक्तीविरोधात एक प्रकरण आलं होतं. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवणाऱ्या मुलानं आपलं कुटुंब आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्यांची जबाबदारी घेणे टाळले आहे, असं या याचिकेत म्हटलं होतं.

ज्या व्यक्तीला अनुकंपा तत्वावर रेल्वेमध्ये (Railway) सरकारी नोकरी मिळाली होती, त्याच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुधा शर्मासह कुटुंबातील अन्य सदस्यांनी ही याचिका केली होती. त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी होते. सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वेत अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली होती.

आपलं कुटुंब आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्यांची काळजी घेण्याच्या एका आश्वासनावर अनुकंपा तत्वावर ही नोकरी (Government Job) देण्यात आली होती. मात्र, त्या व्यक्तीनं आश्वासन पाळलं नाही. कुटुंबीयांची जबाबदारी घेणे टाळले. याच कुटुंबात एक वृद्ध व्यक्तीही आहे, असं याचिकेत म्हटलं आहे.

कोर्टानं काय म्हटलं?

या याचिकेवर सुनावणी करताना न्या. पंकज भाटिया म्हणाले की, सरकार कुटुंबातील एखाद्या उचित सदस्याला (पती, पत्नी किंवा मुलं) यांना अनुकंपा तत्वावर नोकरी देतं. आपल्या कुटुंबातील सदस्यांचा सांभाळ करण्याचा त्यामागचा उद्देश असतो. अचानक काही संकट कोसळलं तर त्यातून सावरावं हा त्यामागचा हेतू असतो.

दरम्यान, या प्रकरणावर निकाल देताना, ज्या व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली आहे, त्याने जर आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा सांभाळ केला नाही तर त्याची नियुक्ती रद्द केली जाऊ शकते, अशी टिप्पणी त्यांनी केली. या प्रकरणात पुढील तीन महिन्यांत योग्य तो निर्णय घ्या, असा आदेशही रेल्वेला दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : उन्हाचा पारा वाढला, महिलेने थेट स्कूटीच्या सीटवर बनवले गरमागरम डोसे, पाहा VIDEO

Radhika Khera Resign: श्रीराम मंदिराचे दर्शन घेतल्याने पक्षातून विरोध.. काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा!

Heat Wave : उष्णतेची लाट; जळगाव, वर्ध्यात तापमान पोहचले ४४ अंशांवर

Raigad Lok Sabha: मोठी बातमी! सुनील तटकरेंसह रायगडमधील ४ उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा

Breakfast Recipe: ज्वारीच्या पीठापासून बनवा झटपट पौष्टीक नाश्ता

SCROLL FOR NEXT