Violent Clash Over Veg vs Non-Veg Biryani Saam
देश विदेश

हॉटेलमध्ये रक्तरंजित थरार! नॉन व्हेज बिर्याणी दिल्यामुळे तरुणाची सटकली, रेस्टॉरंट मालकावर गोळी झाडली अन्...

Violent Clash Over Veg vs Non-Veg Biryani: शाकाहारी बिर्याणीऐवजी मांसाहारी बिर्याणी देण्यावरून रांचीमध्ये तुफान राडा.रेस्टॉरंट मालकावर गोळी झाडली.

Bhagyashree Kamble

  • रेस्टॉरंटमध्ये रक्तरंजित थरार.

  • शाकाहारी बिर्याणीऐवजी मांसाहारी बिर्याणी देण्यावरून राडा.

  • हॉटेल मालकावर गोळी झाडली.

  • आरोपी फरार.

झारखंडच्या रांचीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका किरकोळ वादाचा शेवट रक्तरंजित हाणामारीत झाला आहे. कांके रोडवरील चौपाटी रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी बिर्याणी ऐवजी मासांहारी बिर्याणी दिल्याचा आरोप करत ग्राहक आणि रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. हा वाद काही क्षणात चिघळला. या घटनेदरम्यान, रेस्टॉरंटच्या मालकावर गोळी झाडण्यात आली. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. अभिषेक असे आरोपीचे नाव असून, विजय नाग असे मृत रेस्टॉरंट मालकाचे नाव आहे. कांके रोडवर चौपाटी रेस्टॉरंट आहे. घटनेच्या दिवशी काही जण जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तिथे आरोपी अभिषेक देखील जेवायला गेला होता.

आरोपीनं बिर्याणी ऑर्डर केली होती. रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी ऐवजी मासांहारी बिर्याणी दिल्याचा आरोप त्यानं केला. अभिषेकनं गंभीर आरोप वाद घालण्यास सुरूवात केली. रेस्टॉरंटमधील कर्मचारी आणि अभिषेकमध्ये तुफान राडा झाला. हा वाद काही क्षणात चिघळला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.

या घटनेदरम्यान, रेस्टॉरंट मालक विजय़ नाग यांनी हस्तक्षेप केला. त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी अभिषेक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरू पुरावे गोळा करून तपासाची चक्रे फिरवली आहेत. आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Ast: 139 दिवस ग्रहांचा सेनापती मंगळ राहणार अस्त; 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर, अडचणीही वाढणार

Delhi car Blast Live updates : दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट

Maharashtra Live News Update : यवतमाळ पालिकेसाठी शिंदेसेना-अजित पवार गटाचा फॉर्म्युला ठरला

Kalyan Crime: कल्याणमध्ये चाललंय काय? नशेखोर तरुणांचा हैदोस, मराठी बोलता आलं नाही; परप्रांतीयांना बेदम मारहाण

Prem Chopra Hospitalised: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोपड़ा यांची प्रकृती बिघडली; मुंबईच्या रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT