विहिरीत पाणी भरण्यासाठी गेली, पाय घसरला अन्.. ऐन दिवाळीत महिलेचा बुडून मृत्यू; पुण्यात खळबळ

Tragic Incident in Pune: राजगड तालुक्यातील शिरकोली परिसरात महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबल उडाली आहे.
Tragic Incident in Pune
Tragic Incident in PuneAI
Published On
Summary
  • शिरकोली परिसरात महिला विहिरीत पडली.

  • विहिरीजवळ पाय घसरला.

  • पाण्यात बुडून मृत्यू.

पुण्यातील राजगडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. विहिरीवर पाणी भरण्यासाठी जाताना महिलेचा पाय घसरला. महिला थेट विहिरीत पडली. काही वेळेनंतर महिलेचा मृतदेह तरंगत पाण्यावर आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही घटना पुण्यातील राजगड तालुक्यातील शिरकोली परिसरातील डानंगे खिंड येथून उघडकीस आली आहे. रमाबाई मरगळे असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रमाबाई पाणी भरण्यासाठी विहिरीडजवळ गेल्या होत्या. मात्र, त्यांचा पाय घसरला.

Tragic Incident in Pune
२१ दिवस गव्हाची चपाती नाही खाल्ली तर? शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञ सांगतात..

पाय घसरून त्या थेट विहिरीत पडल्या. त्यांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मदतीसाठी आरडाओरडाही केला. मात्र, मदतीसाठी कुणीही धावून आलं नाही. पोहता आलं नाही म्हणून महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही वेळानंतर महिलेच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली.

Tragic Incident in Pune
'बहिणीवर बलात्कार अन् आईला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त', माजी मंत्र्यांवर बायकोचे खळबळजनक आरोप

मात्र, महिला सापडली नाही. काही वेळानंतर महिलेचा मृतदेह तरंगत पाण्यावर आला. गावकऱ्यांनी विहिरीत महिलेचा मृतदेह पाहिला. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वेळ रात्रीची असल्यामुळे स्थानिकांच्या मदतीने रात्री बॅटरीच्या उजेडात मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी वेल्हे आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com