congress  Saam Tv
देश विदेश

Jharkhand News : मतदानापूर्वी काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या; परिसरात एकच खळबळ

झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील मतदानपूर्वी भुरकंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काँग्रेस नेत्याची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे

साम टिव्ही ब्युरो

रामगड : झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील मतदानपूर्वी भुरकंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काँग्रेस नेत्याची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. रामगडमध्ये २७ फेब्रुवारी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २ मार्च रोजी होईल. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस (Cogress) नेते राजकिशोर हे घरापासून १०० मीटरच्या अंतरावर एका पेट्रोल पंपाजवळ फोनवर कोणाशी तरी बोलत होते. त्यावेळी दुचाकीवरून तिघे जण आले आणि त्यांनी राजकिशोर यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या गोळीबारानंतर राजकिशोर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजकिशोर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, पोलीस कर्मचारी अमित कुमार यांनी सांगितले की,'या हत्येचा तपास सुरू केला आहे. या घटनेतील आरोपींचा शोध देखील सुरू केला आहे'. दरम्यान, रामगडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे.

ही पोटनिवडणूक काँग्रेस आमदार यांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर पोटनिवडणूक होत आहे. एका प्रकरणात काँग्रेस आमदार ममता देवी यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. त्यानंतर त्यांची जागा रिकामी झाल्यानंतर पोटनिवणडूक घेण्यात आली. ममता देवी यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच नियमानुसार, ममता देवी या पुढील ११ वर्षे निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सदा सरवणकर यांच्यावर सुषमा अंधारे यांची टीका

Maharashtra Politics: अजितदादा वाघ होते पण त्यांची नखं भाजपने काढली, उत्तम जानकरांची बोचरी टीका

Pune Election : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत मॅनेजर होण्याची संधी; महिना ८७००० रुपये पगार, पात्रता काय? जाणून घ्या

Ice cream ला संस्कृतमध्ये काय म्हणतात? तुम्हाला माहितेय का?

SCROLL FOR NEXT