Robbery In Express Train Saam TV
देश विदेश

Robbery In Express Train: धावत्या ट्रेनमध्ये दरोडा! फायरींग करत लाखोंचा मुद्देमाल लंपास; प्रवाशी जखमी

Sambalpur To Jammu Tawi Express Loot: संबलपूर-जम्मू तवी एक्सप्रेसमध्ये ही सर्व घटना घडलीये.

Ruchika Jadhav

Jharkhand Robbery:

झारखंडमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये दरोडा टाकण्यात आलाय. दरोडेखोरांनी प्रवाशांची लूट करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला, असा आरोप प्रवाशांनी केला आहे. संबलपूर-जम्मू तवी एक्सप्रेसमध्ये ही सर्व घटना घडलीये. (Latest Marathi News)

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संबलपूर-जम्मू तवी एक्सप्रेसमधील S9 बोगीत रात्री ८ ते १० च्या सुमारास काही दरोडेखोर चढले. ट्रेनमध्ये आल्यावर त्यांनी मोठा गोंधळ घातला. यामुळे नागरिक प्रचंड घाबरले. दरोडेखोरांनी दहशत पसरवण्यासाठी ८-१० वेळा बंदुकीच्या गोळ्या हवेत झाडल्या.

नागरिकांची लाखोंची लूट

भयभीत झालेल्या नागरिकांकडून दरोडेखोरांनी लाखोंची लूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दहशत पसरवत दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण केली. त्यांच्याकडे असलेलं सोनं, चांदी आणि पैसे असा सर्वच मुद्देमाल लंपास केला. प्रवाशांची लूट केल्यानंतर या दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.

धावत्या एक्सप्रेसची चेन खेचली

प्रवाशांची लूट केल्यावर मध्येच दरोडेखोरांनी एक्सप्रेस ट्रेनची चेन खेचली आणि तेथून पळ काढला. पुढे डालतेनगंज स्थानकावर ट्रेन पोहचल्यावर प्रवाशांनी मोठा गोंधळ घातला. त्यामुळे ट्रेन दीड ते दोन तास डालतेनगंज स्थानकावर थांबून होती.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी प्रवाशांना मेदिनी राय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून उपचार दिले. संतप्त प्रवाशांची समजूत घातली. पोलिसांनी दरोडेखोरांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT