Jharkhand Crime news Brothel Racket in Ranchi Hostel Saam Tv News
देश विदेश

गर्ल्स हॉस्टेल बनलं देहविक्रीचा अड्डा; व्हॉट्सअ‍ॅपवर डील अन् मोठी रक्कम, १० तरूणींसह ११ जण ताब्यात

Latest Crime news: रांचीच्या ओम गर्ल्स हॉस्टेलमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस. पोलिसांनी छापा टाकून १० ते ११ जणांना अटक केली. मुलींची डील व्हॉट्सअॅपवर ठरवून त्यांना विविध ठिकाणी पाठवलं जात होतं.

Bhagyashree Kamble

  • रांचीच्या ओम गर्ल्स हॉस्टेलमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस.

  • पोलिसांनी छापा टाकून १० ते ११ जणांना अटक केली.

  • मुलींची डील व्हॉट्सअॅपवर ठरवून त्यांना विविध ठिकाणी पाठवलं जात होतं.

  • याआधी हजारीबागमध्येही मोठा सेक्स रॅकेट उघड झाला होता.

गर्ल्स हॉस्टेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार झारखंडच्या रांचीमधून उघडकीस आला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकली. तसेच १० तरूणींसह ११ जणांना ताब्यात घेतलं आहे. हॉस्टेलमधून पीडित मुलींनी विविध ठिकाणी पाठवले जात होते. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांचीच्या लालपूरमध्ये ओम गर्ल्स हॉस्टेलमध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू होता. मुलींच्या वसतीगृहात सेक्स रॅकेट सुरू होते. पोलिसांना वेश्याव्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ एक पथक तयार केले. तसेच छापा टाकत कारवाईला सुरूवात केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की, वसतीगृहाचा वापर बऱ्याच काळापासून सेक्स रॅकेट म्हणून केला जात होता.

ही टोळी पीडित तरूणींना गर्ल्स हॉस्टेलमध्ये ठेवत असे. तसेच त्यांची डील व्हॉट्सअॅपवर ठरल्यानंतर त्या ठिकाणी पाठवत असे. या बदल्यात त्यांना मोठी रक्कम मिळत होती. या ऱॅकेटमध्ये अनेक बाहेरील लोकांचाही सहभाग असू शकतो, असाही अंदाज पोलिसांना व्यक्त केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १० तरूणींसह ११ जणांना ताब्यात घेतलं आहे.

शहर डीएसपी वेंकटेश रमण , कोतवाली डीएसपी प्रकाश सोय, लालपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी रूपेश कुमार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी यांनी या सेक्सचा रॅकेटवर छापा टाकून कारवाई केली आहे. या प्रकरणाचा सुत्रधार आणि साथीदारांची ओळख पटवली जात आहे.

यापूर्वीही ११ ऑगस्ट रोजी, पोलिसांनी झारखंडमधील हजारीबागमध्ये एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. महामार्गालगतच्या सहा हॉटेल्सवर छापा टाकण्यात आला होता. २६ तरूण-तरूणी आक्षेपार्ह स्थितीत आढळले. यातील १७ जणांना तुरूंगात पाठवण्यात आलं होतं. या सेक्स रॅकेटमध्ये हॉटेल्सचे संचालक आणि व्यावस्थापक यांचाही समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, धावत्या ट्रकमधून व्हॅक्सिनचा मुद्देमाल जप्त

Jerusalem Terror Attack : राजधानीत दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार! ५ जणांचा जागीत मृत्यू, थरारक VIDEO समोर

Viral Video: अजबच! बी. एड . करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जलवा, परीक्षेला चक्क हेलिकॉप्टरने गेले

Maval : ग्रामसभेत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; ग्रामपंचायत प्रशासनाला कंटाळून नागरिक संतप्त

Bigg Boss 19: 'नॉमिनेशनचा दिवस येऊ द्या...', तान्या मित्तलने कुनिकाला दिली धमकी ; बिग बॉसच्या घरात नवा गोंधळ

SCROLL FOR NEXT