देश विदेश

Jharkhand Assembly Election: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, दोन टप्प्यात होणार मतदान

Jharkhand Assembly Election: मुख्य निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

Bharat Jadhav

निवडणूक आयोगाने झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 81 जागा आहेत. येथे 2.6 कोटी मतदार आहेत. झारखंडमध्ये 29 हजार 562 मतदान केंद्रांवर मतदान असतील. यात 24 हजार 520 बूथ ग्रामीण भागात असतील.

निवडणूक आयोगाने झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. झारखंडमध्ये 2.6 कोटी मतदार आहेत.

झारखंड विधानसभा जागा

दोन टप्प्यातील निवडणुका

मतदान- 13 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर

सर्वसाधारण जागा- 44

SC-09

ST-28

मतदानाचा निकाल- 23 नोव्हेंबर

बहुमताचा आकडा- 41

निवडणुकाच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले. नुकताच आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड राज्याचा दौरा केला होता. तेथील अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ज्येष्ठ मतदरांसाठी अनेक सुविधा पुरवल्या आहेत. मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची सुविधा पुरवण्यात येणार आहे. तसेच ८५ वयापेक्षा जास्त वयाच्या मतदारांना घरातून मतदान करण्याची सुविधा देखील पुरवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT