jee main exam 2022 session one result, nta, students,
jee main exam 2022 session one result, nta, students,  saam tv
देश विदेश

JEE Exam Result 2022 : जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 'या' संकेतस्थळावर निकाल उपलब्ध

साम न्यूज नेटवर्क

सातारा : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आज जेईई मुख्य परीक्षा सेशन एकचा निकाल (JEE Main Exam 2022 Result) जाहीर केला. याबाबतची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने ट्विट करुन दिली आहे. या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी खूल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी (students) ७५ टक्के तर एसीसी (SC), एसटी (ST), अपंगांसाठी (Handicap) ६५ टक्के आवश्यक आहेत. या परीक्षेची अंतिम उत्तराची यादी नुकतीच (सहा जुलै) प्रसिद्ध झाली होती. (JEE Main Exam 2022 Result Marathi News)

या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित टक्के मिळवले आहेत ते पुढील सेशन म्हणजे सेशन दाेनसाठी पात्र ठरले आहेत. सेशन दाेनची परीक्षा झाल्यानंतर एनटीए jee advance परीक्षेसाठीची अंतिम कट ऑफ जाहीर करेल.

असा पहा जेईई मुख्य सेशन एकचा निकाल

जेईईच्या (jeemain.nta.nic.in) या मुख्य संकेतस्थळावर गेल्यानंतर (JEE Main 2022 Session 1 Result) या लिंकवर क्लीक करा. तेथे तुमची आवश्यक ती माहिती भरा आणि प्रक्रिया पुर्ण करा. त्यानंतर निकाल तुम्हांला स्क्रीनवर दिसेल. तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड देखील करु शकाल. तसेच निकालाची प्रिंट देखील काढू शकता.

जेईईचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ

jeemain.nta.nic.in

ntaresults.ac.in

nta.ac.in

दरम्यान एनटीए जेईई मुख्य परीक्षा सेशन २ ही परीक्षा २१ ते ३० जुलै या कालावधीत हाेईल. सेशन २ ची परीक्षा पार झाल्यानंतर काऊन्सेलिंगसाठी ऑल इंडिया रँक (AIR) आणि कट ऑफ जाहीर होईल.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Shortage News | मुंबईवर पाणीकपातीचे सावट, 17 टक्केच पाणीसाठा शिल्लक

Today's Marathi News Live : शिंदे गटाकडून ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक

Viral Video : उन्हाचा पारा वाढला, महिलेने थेट स्कूटीच्या सीटवर बनवले गरमागरम डोसे, पाहा VIDEO

Radhika Khera Resign: श्रीराम मंदिराचे दर्शन घेतल्याने पक्षातून विरोध.. काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा!

Heat Wave : उष्णतेची लाट; जळगाव, वर्ध्यात तापमान पोहचले ४४ अंशांवर

SCROLL FOR NEXT