पुणे : मी उपमुख्यमंत्री होतो, आम्ही सत्तेत असताना काम करत होतो. काम करत असताना लावरे लगेच फोन अशी माझी ही शैली होती. मात्र फोन लावत असताना आम्ही आधी कधी कॅमेरा लावला नाही असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना पुणे (pune) लगावला आहे. (ajit pawar latest marathi news)
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (रविवार) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातही ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय (obc reservation) निवडणुका होऊ नयेत अशी आमची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयात (supreme court) मंगळवारी (ता.12) ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील इम्पेरिकल डाटा तयार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जसं मध्यप्रदेश सरकारचं इम्पेरिकल डाटा ग्राह्य धरून तिथं ओबीसींना आरक्षण दिले. त्याच प्रकारे महाराष्ट्र सरकारचा डाटा ग्राह्य धरुन महाराष्ट्रातही ओबीसी समाजाला आरक्षण द्याव अशी माफक अपेक्षा असल्याचे पवार यांनी नमूद केले.
उद्याचा निकाल महत्वाचा
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विषयी उद्या सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीत पक्षांतर बंदी कायदा जर तंतोतंत लागू केला तर उद्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या बाजूने लागला पाहिजे असं मला सर्व तज्ञ वकिलांनी सांगितले आहे.
उच्च न्यायालयात धाव घेऊ : अजित पवार
दरम्यान महाविकास आघाडी सरकारने (mva) डीपीडीसीत जे निर्णय घेतले होते ते सर्व निर्णय आताच्या सरकारने रद्द केल्यास आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे सरकारला दिला आहे.
..तर प्रवाशांवर बाेजा पडेल
त्याचबरोबर मेट्रो प्रोजेक्ट हा कांजूरमार्ग मध्येच व्हायला हवा. आरे मध्ये मेट्रो प्रोजेक्ट करायला गेल्यास त्याला अजून उशीर होईल. आधीच मेट्रोचा प्रोजेक्टची किंमत ही दहा हजार कोटीने वाढली आहे. त्यामुळे मेट्रो कार्डशेड पुन्हा आरे मध्ये करायचा झाल्यास त्याची किंमत आणखी पंधरा हजार कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फटका देखील भविष्यात मेट्रो मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसेल अशी भिती अजित पवार यांनी व्यक्त केली.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.