file photo
file photo saam tv
देश विदेश

Jaunpur Bride Run Away: लग्नाच्या दिवशीच नवरी पळाली, दुसऱ्या दिवशी गावातल्या शाळेत सापडली, सांगितलं अजबच कारण...

Vishal Gangurde

UP News: लग्न मंडप सजला, वऱ्हाड लग्नासाठी जमलं. लग्नासाठी सर्व तयारी झाली. पण ऐनवेळी नवरी मुलगीच गायब झाली. त्यानंतर लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. नातेवाईकांकडून वधूची शोधाशोध सुरू झाली. मात्र, वधू सापडली नाही. अखेर वधूच्या पित्याने या प्रकरणी तक्रार देखील नोंदवली. उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या जलालपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी हा प्रकार घडला. लग्न मंडपात वधूचं वऱ्हाड येणार होतं. दुपारी पुजेच्या दरम्यान नवरीच गायब झाली. ही वार्ता तिच्या नातेवाईकांना कळताच तिची शोधाशोध सुरू झाली.

मात्र, नवरी काही सापडली नाही. त्यानंतर वधूच्या पित्याने जलालपूर पोलीस स्टेशनमध्ये जात मुलगी हरविल्याची तक्रार नोंदवली. मात्र, लग्न रद्द करण्यात आलं नाही. वराच्या कुटुंबाने त्याचा विवाह दुसऱ्या मुलीशी लावून दिला.

तरुणीला व्हायचंय आयएएस

दरम्यान, वधूला दिवसभर शोधल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी सकाळी एका शाळेत सापडली. तरुणीने सांगितलं की, 'मला कोणी पळवून नेलं नाही. मी स्वत: शाळेत जाऊन लपली. मला यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे.

घरातील मंडळी बळजबरीने माझं लग्न लावून देत होते. यामुळे लग्नाच्या दिवशी पळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

नवऱ्याने केलं दुसऱ्या तरुणीशी लग्न

लग्नाच्या दिवशी नवरी पळाल्याने लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. नातेवाईकांकडून वधूची शोधाशोध सुरू झाली. मात्र, वधू काही सापडली नाही. दोन्ही कुटुंब नवरी पळाल्याने चिंतेत पडले. नातेवाईकांनी तासंतास शोधून नवरी मुलगी सापडली नाही.

अखेर वधूच्या पित्याने पोलिसांत तक्रार दिली. मात्र, नवऱ्या मुलाचे सर्व नातेवाईक जमले होते. नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांनी तातडीने निर्णय घेत त्याला दुसरी नवरी शोधली. त्यानंतर त्याच लग्नमंडपात नवऱ्या मुलाचा विवाह लावून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Mother's Day 2024 : एक दिवस फक्त आईसाठी; 'मदर्स डे' ला तुमच्या माऊलीला द्या हे सुंदर सरप्राईझ

Today's Marathi News Live : भाज्यांचे दर कडाडले, किलोमागे तब्बल ८० रुपयांपर्यंत वाढ; अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा फटका

SCROLL FOR NEXT