Mother's Day 2024 : एक दिवस फक्त आईसाठी; 'मदर्स डे' ला तुमच्या माऊलीला द्या हे सुंदर सरप्राईझ

Mother's Day 2024 Surprise Give to Mom : आईला आनंदी ठेवण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर सुख, समाधान आनंद यावा यासाठी तुम्ही कही प्लानिंग केलं नसेल तर आम्ही काही आइडीया आणल्या आहेत.
Mother's Day 2024
Mother's Day 2024 Saam TV

आकाशाचा कागद गेला, समुद्राची शाई केली तरी देखील आईची महती लिहिण्यास अपुरी पडेल. आई म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला पहिला गुरू. आपल्याला हे सुंदर जग आईमुळेच पाहायला मिळाले. अशात येत्या १२ मेला मदर्स डे आहे. त्यानिमित्त तुम्ही तुमच्या माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद यावा यासाठी काही प्लान केला आहे का?

Mother's Day 2024
Aastad Kale Mother Death: ...म्हणुनी घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून, आईच्या निधनानंतर आस्ताद काळेची भावुक पोस्ट

आई आपला प्रत्येक दिवस चांगला जावा यासाठी झटत असते. त्यामुळे उद्या आपल्याकडे आईसाठी काही करण्याची संधी आहे. आईला आनंदी ठेवण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर सुख, समाधान आनंद यावा यासाठी तुम्ही कही प्लानिंग केलं नसेल तर आम्ही काही आइडीया आणल्या आहेत.

बाहेर फिरायला घेऊन जा

दररोज संसाराचा गाढा ओढताना आई स्वत:साठी जगणे विसरून जाते. आई एक दिवस घरात नसली तर सगळ्यांचं टाइमटेबल बिघडतं. त्यामुळे या मदर्स डेला तुम्ही तुमच्या आईला बाहेर फिरायला घेऊन जा. आईला जे ठिकाण सर्वात जास्त आवडतं तेथे तुम्ही स्वत: आईसोबत फिरून या. आपल्या मुलांनी आपल्याला बाहेर फिरण्यासाठी नेल्याने आईच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद पाहायला मिळेल.

रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जा

आई नेहमीच आपल्यासाठी विविध चमचमीत पदार्थ बनवते. मात्र आपण आईसाठी काय करतो? जर तुम्हाला सुंदर जेवण बनवता येत असेल तर तुम्ही घरामध्येच आईच्या आवडीचे पदार्थ बनवा. अन्यथा तुम्ही आईला घेऊन बाहेर जेण्यासाठी जा. येथे आईला स्पेशल फिल व्हावं म्हणून आईवर आधारीत एखादं गाणं हॉटेल मालकास लावण्यास सांगा.

सुंदर साडी

प्रत्येक महिलेला कपड्यांवर जास्त प्रेम असतं. सर्वच मुलींची आपल्याकडे कपडेच नाहीत अशी तक्रार कायम असते. आई अशी तक्रार करत नसली तरी तिला देखील शॉपींग करायला फार आवडतं. त्यामुळे तुम्ही आईला शॉपींगला घेऊन जा. किंवा तिच्यासाठी सुंदर साडी खरेदी करा.

आईसोबत कॉलिटी टाइम स्पेन्ड करा

तुम्ही आईसोबत कॉलिटी टाइम देखील स्पेन्ड करू शकता. आईला बाहेर फिरण्यासाठी शहरातील एका बागेत घेऊन जा. तिथे कही अॅक्टीविटी तिला करू द्या. किंवा एखाद्या अनाथ आश्रमात आईच्या हस्ते दान करा. अशा सर्व गोष्टींनी तुमच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद काही औरच असेल.

Mother's Day 2024
Mom’s Magic Pickle नं चाखली यशाची चव; फक्त ४००० रुपयांपासून व्यवसायची सुरूवात, आज दरमहा अडीच लाखांची कमाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com