Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Marathwada Water Storage : मराठवाड्यात फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा सध्या भीषण संकटाला सामोरं जावं लागत आहे.
Marathwada Water Crisis
Marathwada Water CrisisYandex

माधव सावरगावे साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा सध्या भीषण संकटाला सामोरं जावं लागत आहे. दुष्काळाच्या झळा मराठवाड्यात अधिक तीव्र झाल्या आहेत. गाव आणि वस्त्यांवर (Marathwada Water Crisis) पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात आज घडीला फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक माहिती समोर येत आहे.

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पात फक्त १७.३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर या ११ प्रकल्पांपैकी ३ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची (Marathwada Water Storage) शक्यता आहे. चिंताजनक बाब म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 8 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्याची आकडेवारी समोर आली आहे. जायकवाडी धरणात ८ टक्के, येलदरी धरणात ३० टक्के, सिध्देष्वर धरणात २ टक्के, माजलगांव धरणात ० टक्के, मांजरा धरणात ३ टक्के, उर्ध्व पेनगंगा धरणात ४१ टक्के, निम्न तेरणा धरणात ० टक्के, निम्न मनार धरणात २७ टक्के, विष्णुपुरी धरणात ३० टक्के, निम्न दुधना धरणात (Marathwada Water Shortage) ० टक्के, सिना कोळेगांव धरणात ० टक्के पाणीसाठा शिल्लक आहेत.

Marathwada Water Crisis
Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या टॅंकरने पाणीपुरवठा केला जात (Chhatrapati Sambhajinagar News) आहे. नागरिकांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वणवण होत असल्याचं चित्र आहे. सध्या तर एकूण पाणीसाठ्यापैकी फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिन्याच्या सुरूवातीलाच भीषण पाणीसंकट मराठवाड्यावर असल्याचं दिसत आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी हाल होत ( Water Crisis) आहेत.

Marathwada Water Crisis
Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com