Buldhana Accident News
Samruddhi Highway AccidentSaam TV

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर एका कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले.
Published on

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

Buldhana Accident News

समृद्धी महामार्गावर एका कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३०४ येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

Buldhana Accident News
Buldhana Crime News: संतापजनक! दुचाकीस्वाराला धडक दिली, जखमीला उपचारासाठी नेतो सांगून दरीत फेकलं; आरोपीला अटक

मुकेश अनुज राम मेहेर, लताबाई पुरुषोत्तम मेहेर, अत्मजा मुनोरबोद अशी मृतांची नावे आहेत. अपघातात दोनजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतक आणि जखमी छत्तीसगड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg Accident) अपघातांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीय.

समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचं समोर येतं आहे. महामार्गावर होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी आतापर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अपघातांच्या मालिकेनंतर समृद्धीवर प्रवास करायचा की नाही? असा प्रश्न आता पडत आहे.

बुलढाण्यात एसटी बस-खासगी बसचा अपघात

चिखली-मेहकर मार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास एसटी बस आणि एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.

Buldhana Accident News
Malshej Ghat Accident: मोठी बातमी! माळशेज घाटात भीषण अपघात; पती पत्नीसह चौघांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com