Buldhana Crime News: संतापजनक! दुचाकीस्वाराला धडक दिली, जखमीला उपचारासाठी नेतो सांगून दरीत फेकलं; आरोपीला अटक

Accident Victim Body Dumped In Valley: बुलढाणा जिल्ह्यात अपघातातील जखमीचा उपचार न करता मृतदेह दरीत टाकून दिल्याचं समोर आलं आहे. परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
Buldhana Crime News
Buldhana Crime NewsYandex

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी परिसरात एका युवकाचा मृतदेह आढळून (Buldhana Crime News) आला. त्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अपघातातील जखमीचा उपचार न करता मृतदेह दरीत टाकून दिल्याचं समोर आलं आहे. जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील युवक मन्साराम छत्ररसिंग वासकले हा लग्न समारंभाकरिता सातपुडा पर्वत रांगाच्या जंगल परिसरातील भिंगारा येथे गेला होता.

लग्न समारंभ संपन्न झाल्यानंतर तो संध्याकाळी आपल्या गावाकडे परत येत होता. तेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहर नजिक असलेल्या गोराळा धरणाजवळ एका मालवाहू पिक-अप वाहनाने त्याच्या मोटरसायकलला जबर धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. अपघातस्थळी उपस्थित गोराळा येथील नागरिकांनी सदर जखमी (Buldhana News) युवकाला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी त्याच मालवाहू वाहनामध्ये टाकले.

दरम्यान वाहन मालकाने त्या गंभीर युवकाला दवाखान्यात घेऊन जातो, असे सांगितले. तो घटनास्थळावरून त्या जखमी युवकाला घेऊन पसार झाला. परंतु त्या वाहनमालकाने सदर जखमी व्यक्तीस वैद्यकीय उपचारासाठी कोणत्याही दवाखान्यात नेले नाही. त्याला सातपुडा घाटातील एका दरीत ढकलून दिल्याचं अमानवीय कृत्य ( Accident Victim Body Dumped In Valley) केलं.

Buldhana Crime News
Akola Crime: खिडकीतून आतमध्ये प्रवेश... अकोल्यात प्रसिद्ध उद्योजकाचे घर फोडले; २ कोटींचा मुद्देमाल लंपास

दरम्यान आज सकाळी या बेपत्ता युवकाचा मृतदेह हा सातपुडा पर्वतातील वनविभागाच्या चौकीच्या परिसरात आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन संबंधित वाहन क्रमांकाच्या आधारे तपासणी (Buldhana Crime) केली. ठाणेदार आनंद महाजन यांनी आपले तपासचक्र गतिमान करून एका तासाच्या आत आरोपीला जेरबंद केले आहे. सदर आरोपीवर विविध कलमांच्या आधारे कलम 304, 201 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Buldhana Crime News
Mumbai Crime: कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्.. मुंबईतील संतापजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com