Mumbai Crime: कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्.. मुंबईतील संतापजनक घटना

Mumbai Crime: तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे खंडणीची मागणीही करण्यात आली. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv

मुंबई, ता. २ मे २०२४

२२ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिचा अश्लिल व्हिडिओ बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या मालवणी परिसरात घडला. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे खंडणीची मागणीही करण्यात आली. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे.

याबाबत हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित २२ वर्षीय महिला ही एव्हेंट मॅनेजर म्हणून काम करते. पीडित महिला आणि आरोपी दांपत्य एकमेकांना ओळखत होते ते जवळपासच्या भागातच राहत होते. रविवारी तिला आरोपी दांपत्याने आपल्या घरी बोलावले होते. यावेळी तिला कोल्ड्रिंगमधून गुंगीचे औषध देण्यात आले. ज्यानंतर ती बेशुद्ध होताच आरोपी महिलेच्या पतीने तिच्यावर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने याचे व्हिडिओही शूट केले.

त्यानंतर पिडितेला तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे १० हजारांच्या खंडणीची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणाने घाबरलेल्या तरुणीने याबाबत आपल्या कुटुंबियांना सांगितले .ज्यानंतर पोलिसांत धाव घेत दांपत्याविरोधात तक्रार दाखल केली.

Mumbai Crime News
Chikhaldara Temperature : चिखलदराचे तापमान ३९ अंशावर; तापमान वाढल्याने विदर्भातील थंड हवेचे ठिकाण पडलं ओस

पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पती-पत्नीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच 36 वर्षीय ब्युटीशियनला अटक करण्यात आली असून तिच्या पतीचा शोध सुरू करण्यात आला आहे. या दोघांवर भारतीय दंडसंहिता कलम ३७६ (बलात्कार), ३२८, ३८५ तसेच खंडणी मागितल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Mumbai Crime News
Chikhaldara Temperature : चिखलदराचे तापमान ३९ अंशावर; तापमान वाढल्याने विदर्भातील थंड हवेचे ठिकाण पडलं ओस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com