Japan Earthqueake  Saam Tv
देश विदेश

Japan Earthqueake News : नववर्षात जपानला भूकंपाचा दुसरा मोठा धक्का

Earthqueake In Japan : नववर्षाच्या सुरूवातीला जपानमध्ये भूकंपाचं सत्र सुरू झालंय. आज पुन्हा एकदा ६.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. परंतु अजुन त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Japan Earthqueake Magnitude

१ जानेवारी रोजी मध्य जपानच्या काही भागात भूकंपाचे धक्के बसले होते. त्या धक्क्यांमधून सावरत नाही, तेच लगेच आठवडाभरानंतर हा भूकंप आलाय. यावेळी भूकंपाची तीव्रता ६.० स्केल आहे. (latest earthqueake news)

मध्य जपानमध्ये ६.० रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे जोरदार हादरा बसलाय. परंतु, अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही, असं जपान सरकारने माध्यमांना सांगितलं आहे. हा भूकंप जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी जिथे भूकंप झाला होता, त्याच भागात झालेला (japan) आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भूकंप

१ जानेवारी रोजी मध्य जपानच्या काही भागांत भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं (Japan Earthqueake) होतं.

त्या घटनेतील मृतांची संख्या २०० च्या पुढे गेली आणि १०० हून अधिक अद्याप बेहिशेबी आहेत, असं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलंय. यावेळी भूकंपाची तीव्रता ७.५ रिश्टर स्केल होती. यावेळी भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळं अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या. अनेक ठिकाणी आग लागली आणि नोटो द्वीपकल्पातील पायाभूत सुविधा नष्ट झाल्या (Earthqueake) होत्या.

रिश्टर स्केल म्हणजे काय

भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातोय. यावरुन भूकंप तीव्र आहे की, सौम्य हे ओळखता येते. रिश्टर स्केलवरून भूकंपात किती नुकसान झालंय, याचाही अंदाज लावता येतो. रिश्टर स्केलवरून भूकंपाची तीव्रता ठरवली जाते.

रिश्टर स्केल १.० ते २.९ मध्ये भूकंपाची तीव्रता सौम्य असते.याचे धक्के जाणवत नाही. रिश्टर स्केल ३.० ते ३.९ मध्ये देखील भूकंपाची तीव्रता सौम्यच असते. पण याचे धक्के काहींना जाणवतात. यात नुकसान होत नाही. रिश्टर स्केल ४.० ते ४.९ मधील भूकंपाची तीव्रता कमी असते. या भूकंपात कमकुवत जुन्या इमारतींना धोका असतो. रिश्टर स्केल ५.० ते ५.९ मध्ये भूकंपाची तीव्रता मध्यम असते. यात कमकुवत जमीन, घरांना धोका असतो. रिश्टर स्केल ६.० ते ६.९ मधील भूकंप जोरदार असतो. यात लोकसंख्या जास्त असलेल्या भागात नुकसान होतं. रिश्टर स्केल ७.० ते ८ पेक्षा जास्त रिश्टर स्केल असलेला भूकंप हा विनाशकारी असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT