japan Earthquakes social media
देश विदेश

japan earthquakes : भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी थरथरला जपान; ७.६ रिश्टर स्केल तीव्रता, त्सुनामीचा अ‍ॅलर्ट

Japan 7.6 magnitude earthquakes जपानच्या हवामान खात्याच्या माहितीनुसार, आओमोरी आणि होक्काइडो किनाऱ्यावर भूकंपाचे तीव्र धक्के बसले. भूकंपानंतर परिसरात ३ मीटर म्हणजेच जवळपास १० फूट उंच समुद्राच्या तीव्र लाटा उसळतील असा इशारा दिला आहे.

Nandkumar Joshi

  • जपानमध्ये भूकंपाचे जोरदार झटके

  • ७.६ रिश्टर स्केल तीव्रता

  • राजधानी टोकियोत ३० सेकंदांपर्यंत हादरे

  • त्सुनामीचा अलर्ट, उंच ठिकाणी जाण्याचे नागरिकांना आवाहन

जपानच्या उत्तरेकडील भाग भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले. देशाच्या हवामान खात्याच्या माहितीनुसार, सोमवारी, ८ डिसेंबर रोजी समुद्रकिनाऱ्याजवळ ७.६ रिश्टर स्केलचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनंतर जपानच्या पूर्वेकडील किनारी भागात त्सुनामीचा अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या पूर्वेकडे स्थानिक वेळेनुसार रात्री सव्वाअकराच्या सुमारास किनाऱ्यापासून साधारण ४४ मैल (७० किलोमीटर) दूर आणि अंदाजे ३३ मैल खोलवर हे भूकंपाचे जोरदार धक्के बसले. आओमोरी आणि होक्काइडोचा किनारी भाग भूकंपानं थरथरला. भूकंपानंतर १० फूट उंच म्हणजेच ३ मीटरपर्यंतच्या समुद्री लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

जपानी एजन्सीनुसार, सर्वात जास्त धोका हा इशिकावा प्रांत आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराला आहे. भूकंपाचे हादरे बसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पब्लिक ब्रॉडकास्टर एनएचकेने दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातील न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला जात आहे. याशिवाय जपानच्या हवामान खात्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तात्काळ उंच ठिकाणी निघून जावे, असे आवाहन केले आहे. टीव्ही चॅनलवर सातत्याने आपत्कालीन माहिती प्रसारित केली जात आहे.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, भूकंपाची तीव्रता इतकी अधिक होती की त्याचे हादरे जवळपास ३० सेकंदहून अधिक वेळ राजधानी टोकियोमध्ये जाणवले. एनएचकेनुसार, या परिसरात न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या सुरक्षिततेची तपासणी केली जात आहे. अद्याप भूकंपामुळं कुठंही जीवितहानी अथवा मोठी वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सर्व यंत्रणांची पथके सतर्क झाली असून, बचाव आणि मदतकार्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नेता अन् तरुणी बेडवर नको त्या अवस्थेत, अश्लील व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर; परप्रांतीयांची 2 किमीची रांग, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मृत्यूचा सापळा ठरलेल्या पुलावरून कालव्यात कार कोसळली, अपघातात तिघे गंभीर जखमी

Monday Horoscope: कामाच्या नव्या संधी मिळतील, ५ राशींचे प्रेमसंबंध सुधारणार; वाचा सोमवारचे खास राशीभविष्य

Summer Konkan Tourism : धुक्याची चादर अन् थंडगार वारा; मे महिन्यात करा कोकण वारी, पाहा 'ही' ५ Hidden हिल स्टेशन्स

SCROLL FOR NEXT