Jammu Kashmir Rajouri Saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir Rajouri : जम्मू-काश्मीरमध्ये शोधमोहिमेवेळी आयईडी स्फोट, पाच जवान शहीद

Rajouri Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये शोधमोहिमेवेळी आयईडी स्फोट, पाच जवान शहीद

Satish Kengar

Jammu Kashmir Rajouri : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी वेळोवेळी शोध मोहीम राबवत आहेत. अशीच एक शोध मोहीम राजौरी येथे सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला येथे २ ते ३ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान पाच जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका लष्करी अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांतील ही तिसरी चकमक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही चकमक राजौरीतील कंडी भागात सुरु असून, त्यात दोन-तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पाच जवान शहीद झाले आहेत. जखमींना हेलिकॉप्टरने उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. यादरम्यान २ दहशतवादी ठार झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. राजौरीमध्ये सध्या इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

आयईडी स्फोटात जवान शहीद

सुरक्षा दलांच्या शोध मोहिमेदरम्यान अचानक आयईडी (IED) स्फोट झाला. ज्यात पाच जवान शहीद झाले, असं सांगण्यात येत आहे.

शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी चकमक

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफने माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दल दहशतवाद्यांजवळ पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT