Sharad Pawar Resignation : आज, उद्या, परवा... साहेब आणि साहेबच!; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच?

Sharad Pawar Resignation : मागील तीन दिवसांपासून कार्यकर्ते शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करत आहे.
Sharad Pawar NEWS
Sharad Pawar NEWSSaamtv
Published On

Sharad Pawar: शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी हवेत अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहेत. मागील तीन दिवसांपासून कार्यकर्ते शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करत आहे.

राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीतही तोच सूर उमटला. बैठकीच्या ठिकाणी, राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्ते एकमुखाने करताना दिसले.

Sharad Pawar NEWS
Sharad Pawar News: निवड समितीची बैठक संपली, शरद पवारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, काय झाला ठराव?

काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर पोस्टर्स

यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर पोस्टर्सही लावले होते. आज, उद्या आणि परवा... साहेब, साहेब आणि साहेबच असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे. (Latest Marathi News)

अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. मात्र कार्यकर्त्यांना सध्यातरी अध्यक्षपदी फक्त शरद पवारच हवे आहेत. मात्र शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे आता सर्वाचं लक्ष आहे.

Sharad Pawar NEWS
EXPLAINER: शरद पवार एक-दोन दिवसांत नेमका कोणता निर्णय घेऊ शकतात?

निवड समितीच्या बैठकीत राजीनामा नामंजूर

शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीच्या बैठकीत एकमताने नामंजूर करण्यात आला. समितीने म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आदरणीय पवारसाहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करणे येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com