Sharad Pawar News: निवड समितीची बैठक संपली, शरद पवारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, काय झाला ठराव?

NCP President Committee Meeting: शरद पवार यांनी अध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भामध्ये नेमलेल्या समितीची बैठक पार पडली
Sharad Pawar
Sharad Pawarsaam tv
Published On

Sharad Pawar Retirement: शरद पवार (Sharad Pawar) यांनीच राष्ट्रवादीच्या (NCP) अध्यक्षपदावर राहावं, अशी मागणी मागील दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात शरद पवार यांनी अध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भामध्ये नेमलेल्या समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रफूल्ल पटेल (Praful Patel) यांनी शरद पवार यांचा राजीनामा फेटाळल्याची घोषणा केली आहे.

Sharad Pawar
Sanjay Raut Tweet: 'राजकारणात कोणताही अपघात...'; संजय राऊतांचं सूचक ट्विट, नेमका रोख कुणाकडे?

काय म्हणाले प्रफूल्ल पटेल...

यावेळी बोलताना प्रफूल पटेल म्हणाले की, "त्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या या कार्यक्रमानंतर आम्ही सगळ्यांनी त्यांची भेट घेतली. आम्ही त्यांना वारंवार भेट घेत साहेब तुमची देशाला गरज असल्याचे त्यांना सांगितले. राज्यभरातून देशभरातून सर्वच कार्यकर्त्यांमध्ये हीच भावना पाहायला मिळत आहे."

"साहेबांनी हे पद सोडू नये, जावू नये असेच मत सर्वांनी व्यक्त केले आहे. आज त्याच विषयावर कमिटीची बैठक झाली. ज्यामध्ये शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय राजीनामा नामंजूर करण्यात येत असून त्यांनीच पक्षाध्यक्षपदी त्यांनीच राहावे," असा ठराव सर्वानुमते सादर केला आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Mumbai Crime News: धारावीत पत्नीला पेटवत पतीचीही आत्महत्या, दारुमुळे आयुष्य उद्ध्वस्त

कार्यकर्त्यांकडून जल्लोश...

तसेच या ठरावानंतर शरद पवार यांची भेट घेत त्यांना विनंती करणार असल्याचेही प्रफूल्ल पटेल यांनी सांगितले आहे. दरम्यान, निवड समितीने प्रस्ताव फेटाळल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोश केला आहे. फटाके फोडत मोठ्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जल्लोश केला. मात्र आता या बाबत शरद पवार काय निर्णय घेणार याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com