जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश आले आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. या चकमकीमध्ये २ जवान जखमी झाले आहेत. घटनास्थळी जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील कद्दर भागातील बेहिबाग परिसरामध्ये लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. या चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहेत.
गुरुवारी सकाळी लष्कर आणि पोलिसांना या परिसरात ४-५ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली. शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती होती. लष्कराला ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अनेक चकमक झाली आहे. ज्यामध्ये अनेक दहशतवादी आणि त्यांचे कमांडर मारले गेले आहेत. या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे जवानही जखमी झाले आहेत. काश्मीरमधील श्रीनगर आणि जम्मूमधील चिनाब खोरे, उधमपूर आणि कठुआ यासारख्या भागांमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.