Heartbreaking moment: Father dies of heart attack after his ailing son passes away in Jammu-Kashmir’s Ramban district. Saam tv
देश विदेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Father Died After Sons Death : जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. एका आजारी मुलाचा त्याच्या वडिलांच्या कुशीत मृत्यू झाला मुलाचा मृत्यू झाल्यानंतर काही क्षणातच वडिलांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Bharat Jadhav

  • जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली.

  • आजारी मुलाचा हॉस्पिटलमध्ये जाताना मृत्यू .

  • मुलाच्या मृत्यूचा धक्का वडिलांना बसला त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्याचाही मृत्यू झाला.

मुलांना काही दुखापत झाली तर पालकांना त्रास होत असतो. व्यक्ती मोठ्यात मोठं दुख आपल्या डोळ्यासमोर पाहू शकतो. पण आपल्या डोळ्यात मुलाचा मृत्यू पाहणं हे पालकांच्या मनाला मोठा धक्का देणारं असतं. अशीच एक हृदयद्रावक घटना जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात घडलीय. हॉस्पिटलमध्ये जाताना एका व्यक्तीच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचं पाहून त्या व्यक्तीनेही जीव सोडला. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरलीय.

वृत्तानुसार, शबीर यांचा मुलगा आजारी होता. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने शबीरचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४५ वर्षीय शबीर अहमद गनिया हे त्यांचा आजारी मुलगा साहिल अहमद (१४) याला रुग्णालयात घेऊन जात होते. या दरम्यान साहिलचा मृत्यू झाला. साहिलने आपल्या वडिलांच्या कुशीतच देह त्यागला.

वाटेतच मुलाचा मृत्यू झाल्यानंतर शबीर यांना हा धक्का सहन झाला नाही आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचाही मृत्यू झाला. ही घटना बनिहालच्या तैथर भागात घडली. सकाळी दोघांचे मृतदेह बनिहाल उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान वडील आणि मुलाच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World War 3: जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? मस्क यांचा इशारा, जगाला टेन्शन

Riteish Deshmukh : "लवकरच येत आहोत..." रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, रिलीज डेट काय?

Ladki Bahin : "आम्हालाच मत द्या, नाहीतर 'लाडकी बहीण'चे ₹१५०० बंद करू, भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल"

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Heart Attack: विशी, तिशी आणि चाळिशीतच हार्ट अटॅकचा धोका; फक्त या ५ गोष्टी कराल तर मरणातून वाचाल!

SCROLL FOR NEXT