Jammu Kashmir Bus Accident Update Saamtv
देश विदेश

Doda Bus Accident Update: दुर्दैवी! जम्मू- काश्मीर बस अपघातातील मृतांची संख्या ३९ वर; PM मोदींकडून मदतीची घोषणा

Doda Bus Accident Update: मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाख रुपये देण्याची घोषणा केली.

Gangappa Pujari

Jammu Kashmir Bus Accident Update:

जम्मू काश्मीरमध्ये बुधवारी (१५, नोव्हेंबर) मोठी दुर्घटना घडली. जम्मूच्या डोडा जिल्ह्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस २५० मीटर खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाख रुपये देण्याची घोषणा केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात (Doda Bus Accident) भीषण अपघाताची घटना घडली. किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून 250 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात ३९ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत.

 भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. डोडा येथील पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार अपघातातील मृतांची संख्या ३९ वर पोहोचली आहे, ज्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. तर १७जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालय किश्तवाड आणि सर्वसाधारण रुग्णालय दोडा येथे नेण्यात आलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये..

भीषण अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) शोक व्यक्त केला आहे. 'जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. ज्या कुटुंबांनी आपले नातेवाईक गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. असेच पंतप्रधान मोदी म्हणाले.

तसेच अपघातातील प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये दिले जातील. अशी घोषणाही त्यांनी केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीची दिवाळी, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, नेमकं कारण काय?

Budget Streaming: BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त प्लॅन, फक्त ₹३० मध्ये मिळवा OTT अ‍ॅक्सेस अन् मनोरंजनाची सुविधा

SCROLL FOR NEXT