जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास लष्कराच्या ताफ्यावर अचानक हल्ला केला. वाहनावर ग्रेनेड फेकल्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ला भारतीय सैन्यदलाचे ५ जवान शहीद झाले असून काही सैनिक जखमी आहेत. पाकिस्तान समर्थित पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर अचानक हल्ला कसा केला? याबाबत जखमी सैनिकांने थरकाप उडवणारा प्रसंग सांगितला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, सावनी भागात लष्कराच्या वाहनांवर हल्ला करणारे दहशतवादी रस्त्याच्या कडेला उभे होते.
"हा डोंगराळ भाग असल्याने आम्हाला वाटले, की शेळ्या चारणारे लोक असतील. आमचा ताफा बघताच दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. त्यानंतर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यातून काही सैनिकांना सावरणे शक्य झाले नाही. गंभीर जखमी झाल्याने त्यांनी देशासाठी प्राण त्यागले". (Latest Marathi News)
Powered By
"दहशतवाद्यांच्या हल्ल्याला आम्ही देखील चोख प्रत्युत्तर दिलं. हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. आमच्या जवानांनी त्यांचा पाठलाग केला. सध्या सैन्य दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे".
दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात नाईक बिरेंद्र सिंह (१५ गढवाल रायफल), नाईक करण कुमार (एएससी), रायफलमॅन चंदन कुमार (८९ आर्म्ड रेजिमेंट), रायफलमॅन गौतम कुमार (८९ सशस्त्र रेजिमेंट) आणि अन्य एक सैनिक शहीद झाले. लष्कराने शहिद झालेल्या पाचव्या जवानाचे नाव अद्याप जाहीर केले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.