kathua Encounter saam tv
देश विदेश

प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू असताना घातपाताचा कट उधळला; 'जैश'च्या दहशतवाद्याला कंठस्नान

kathua terror encounter jaish terrorist killed : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा केला. बिलावर परिसरात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली.

Nandkumar Joshi

प्रजासत्ताक दिनाची देशभरात जय्यत तयारी सुरू असताना, सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला. जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये चकमकीत जैश ए मोहम्मद या संघटनेच्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. जम्मूचे आयजीपीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिलावर परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी हे बिलावर परिसरातील घनदाट जंगलात लपून बसले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि सीआरपीएफनं घेराव घातला. जंगलाला चहुबाजूने वेढा घातला. त्यामुळं दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले.

बिलावर परिसरात संयुक्त मोहीम राबवण्यात आली. सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला, अशी माहिती जम्मू रेंजचे पोलीस महानिरीक्षक भीम सेन टुटी यांनी दिली. जम्मू पोलिसांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट शेअर केली. बिलावरमध्ये भारतीय लष्कर आणि सीआरपीएफसह जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोहीम राबवली. या दरम्यान पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं, अशी माहिती पोस्टद्वारे देण्यात आली.

उस्मान असे मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचं नाव असून, तो जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर आहे. त्याच्याकडील एम फोर स्वयंचलित रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकं हस्तगत करण्यात आली. दरम्यान, फेब्रुवारी २०२४ मध्ये उस्मानसह अन्य १० दहशतवाद्यांच्या गटानं जम्मूमध्ये घुसखोरी केली होती. त्यात फरमान, पाशा, आदिल आणि सैफुल्लाह हे दहशतवादी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकटाची चाहुल

शिंदे गटाच्या बड्या नेत्याला अटक, एक वर्षांपासून होता फरार, कायद्याच्या बालेकिल्ल्यात अटकेचा थरार

सूर्यकुमार-शिवमची बॅट तळपली; भारताचा न्यूझीलंडवर दमदार विजय

अकोल्यात भाजपने डाव टाकला; शरद पवारांचा पक्ष फोडला, सत्ता समीकरणासाठी बहुमताचा आकडा गाठला

गोगावलेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांना आत्मसमर्पण, तुरुंगात जावं लागणार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT